PHOTOS

विराटने 15 वर्षात IPL मधून कमवले 173 कोटी; पण 'या' 24 वर्षीय खेळाडूला वर्षाचे मिळणार 6300 कोटी

24 Year Old Football Player Get Rs 6300 Crores For Year | भारतामधील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराटने 2023 च्या आयपीएलसाठी 15 कोटी रुपये मानधन घेतलं. 2008 पासून विराटने आयपीएलमधून 173 कोटींची कमाई केली आहे. मात्र एका 24 वर्षीय खेळाडूला केवळ एका वर्षासाठी तब्बल 6300 कोटी रुपये मिळणार आहेत असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. पण हे खरं आहे. हा खेळाडू कोण आणि कोणी दिलीय ही ऑफर पाहूयात...

Advertisement
1/15

फ्रान्सचा प्रसिद्ध फुटबॉलपटू किलियन एम्बापेने (Kylian Mbappe) मागील वर्षी झालेल्या फीफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये दमदार कामगिरी केली होती. अंतिम सामन्यामध्ये 24 वर्षीय एम्बापेने अर्जेंटिनाविरोधात गोल्सची हॅटट्रीक केली. मात्र अर्जेंटिनाने फ्रान्सवर मात करत विश्वचषक जिंकला.

2/15

विश्वचषकच्या अंतिम सामन्यात एम्बापे एकटा लढला असं अनेकांनी म्हटलं. सध्या एम्बापे हा फ्रान्समधील पीएसजी क्लबकडून खेळतोय. त्याला नुकतीच सौदी अरेबियामधील अल हिलाल क्लबकडून मोठी ऑफर मिळाली आहे. या ऑफरमुळे एम्बापे जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू ठरु शकतो.

3/15

विराट हा इंडियन प्रिमिअर लिगमधील आरसीबीच्या संघाकडून खेळतो. त्याला 2023 मध्ये ही टी-20 स्पर्धा खेळण्यासाठी 15 कोटी रुपये मिळाले होते.

4/15

विराट 2008 पासून आरसीबीकडून खेळत आहे. आयपीएलमधून विराटने आतापर्यंत 173 कोटींची कमाई केली आहे.

 

5/15

आता दुसरीकडे फ्रान्सच्या प्रसिद्ध फुटबॉलपटू किलियन एम्बापेबद्दल बोलायचं झाल्यास त्याला एक भन्नाट ऑफर सौदी अरेबियामधील अल हिलाल क्लबने दिली आहे.

6/15

एक वर्ष या क्लबकडून खेळण्यासाठी एम्बापेला तब्बल 6300 कोटी रुपये दिले जाणार आहे.

7/15

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार फ्रान्समधील पेरिस सेंट जर्मन म्हणजेच पीएसजी क्लबबरोबरचा आपला करार पुढे वाढवण्यास एम्बापेने नकार दिला आहे. त्यामुळेच एम्बापे पीएसजीबरोबर जपानच्या प्री-सिझन टूरलाही जाणार नाहीय. याच निर्णयाचा संबंध अल हिलालच्या ऑफरशी जोडला जातोय.

8/15

एम्बापे आणि अल हिलालदरम्यान खरोखरच डील झाली तर तो जगातील सर्वात महागडा खेळाडू ठरले. 2017 साली एम्बापे हा 1700 कोटींच्या डीलसहीत पीएसजी क्लबशी करारबद्ध झाला होता.

9/15

एम्बापेला करारबद्ध करण्यासाठी इंग्लंडमधील चेल्सीबरोबरच मॅनचेस्टर यूनायटेड, इंटर मिलान आणि बार्सिलोनानेही प्रयत्न केले होते. 

10/15

एम्बापेला 6300 कोटींची ऑफर देणाऱ्या अल हिलाल क्लबबद्दल सांगायचे झाल्यास या क्लबचा मालकी हक्क सौदी अरब पब्लिक इनव्हेसटमेंड फंड कंपनीकडे आहे. जगातील आघाडीच्या फुटबॉलपटूंपैकी एक असलेला क्रिस्तियानो रोनाल्डोही सौदी अरेबियामधील लिगमध्ये खेलतो. त्याने अल नासेर क्लबशी करार केला आहे.

11/15

एम्बापे हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगातील आघाडीच्या खेळाडूंच्या यादीमध्ये 2023 साली तिसऱ्या क्रमांकावर आहे. 'फोर्ब्स'च्या यादीनुसार त्याने 980 कोटींची कमाई केली आहे. रोनाल्डो 1112 कोटींच्या कमाईसहीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर लिओनेल मेस्सी हा 1063 कोटींसहीत तिसऱ्या स्थानी आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट अव्वल 50 मध्येही नाही.

12/15

एम्बापेने डिसेंबर 2022 मध्ये फिफा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात अर्जेंटीना विरोधात सलग 3 गोल केले होते. मात्र त्याचा संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला होता. या विजयासहीत अर्जेंटिनाचा मेस्सी पहिल्यांदाच विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग ठरला. रोनाल्डोला अद्याप त्याच्या संघासाठी विश्वचषक जिंकता आलेला नाही.

13/15

एम्बापेच्या विक्रमाबद्दल सांगायचं झाल्यास फ्रान्सच्या मुख्य संघाकडून 70 सामने खेळला आहे. त्याने एकूण 40 गोल केले आहेत. 2017-19 मध्ये पीएसजीकडून खेळताना त्याने 27 सामन्यांमध्ये 13 गोल केले. 2018 पासून तो पूर्णवेळ पीएसजीकडून खेळू लागला. त्याने या संघाकडून 149 सामन्यांमध्ये 135 गोल्स केले.

14/15

एम्बापे हा फ्रान्सच्या विश्वचषक विजेत्या संघाचाही भाग होता. फ्रान्सने 2018 मध्ये विश्वचषक जिंकला तेव्हा एम्बापे संघात होता. त्याने या स्पर्धेत एकूण 4 गोल केले होते.

15/15

सर्वात कमी वयात फ्रान्सकडून विश्वचषक स्पर्धेत गोल नोंदवण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. त्याला या पर्वासाठी फीफा यंग प्लेअरचा पुरस्कार देण्यात आला होता.





Read More