in Marathi : मनुका हे खायला अनेकांना आवडतात. द्राक्षापासून तयार होणारा हा सुकामेवा खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत....
सुक्या मेव्याचे नाव घेताच आपल्या समोर येतात आधी मनुका, काजू आणि बदाम... मनुका हा एक सुकामेवा असून तो द्राक्षापासून बनतो. गोड असा हा सुकामेवा आरोग्यासाठी परिपूर्ण मानला जातो. त्यात लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबरसारखे गुणधर्म मानला जातो. जे शरीराला अनेक समस्यांपासून आराम देतो. जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी मनुक्यांच्या पाण्याचे सेवन केल्यास तुम्हाला अनेक फायदे होतात.
खरंतर मनुकाचे पाणी बनवणे खूप सोपे आहेत. मनुके एका स्वच्छ काचेच्या भांड्यात किंवा डब्यात रात्रीभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी एका ग्लासमध्ये गाळून घ्या आणि ते प्या.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुका पाणी प्यायला पाहिजे.
पचनाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी मनुकाचे पाणी पिणे हे खूप फायदेशीर मानले गेले आहे. कारण त्यात फायबरचे प्रमाण चांगले असल्याने पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.
मनुक्यात असलेले आर्जिनिन नावाचे प्रथिन शरीरात ऊर्जा वाढवण्यास मदत करतं. त्यामुळे दररोज तुम्ही रिकाम्या पोटी मुनकाचे पाणी प्यायला पाहिजे.
दररोज भिजवलेले मनुके किंवा त्याचे पाणी प्यायल्याने हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.
मनुकामध्ये असलेले गुणधर्म त्वचेसाठी खूप उपयुक्त मानले जातात. दररोज मनुकाचे पाणी पिऊन तुम्ही तुमच्या त्वचेला अनेक समस्यांपासून दूर होण्यास मदत मिळते.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)