PHOTOS

'आजारी असताना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा'; या अभिनेत्रीने सांगितलं की, 'नवरा मनोरुग्ण...'

king Revelation: बॉलिवूड असो किंवा टीव्ही जगत यातील अनेक अभिनेत्रींना लग्नानंतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. एका अभिनेत्र...

Advertisement
1/10

आम्ही बोलत आहोत,  'बडे अच्छे लगते हैं' आणि 'कुबूल है' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री चाहत खन्ना हिचाबद्दल. सध्या अभिनेत्री बिग बॉस 19 मधील प्रवेशावरून चर्चेत आहे. तिने स्पष्टपणे नकार दिला आहे की, ती बिग बॉसमध्ये जाणार नाही. 

 

2/10

चाहत खन्नाने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी भरत नरसिम्हनशी लग्न केलं होतं पण हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. त्यांनी वर्षभरात घटस्फोट 

3/10

या घटस्फोटामागे चाहतने सांगितलं होतं की, तिचा पती भरत नरसिंहन तिच्यावर घरगुती हिंसाचार करत होता. 

 

4/10

त्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री झाली. प्रेमासाठी तिने मुस्लिम धर्म स्विकारून 2013 मध्ये फरहान मिर्झाशी लग्न केलं. या जोडप्याला दोन मुली आहेत. पण हे नात पण फार टिकलं नाही. 

 

5/10

या दोघांनीही 2018 मध्ये घटस्फोट घेतला. अभिनेत्रीने फरहानवर खूप गंभीर आरोप लावले आहेत. 

 

6/10

अभिनेत्रीने सांगितले की, फरहान घरगुती हिंसाचार आणि मानसिक छळ करायचा. चाहतने असेही म्हटले की. तो निरुपयोगी आहे आणि नेहमीच तिचा अपमान करतो आणि तिच्यावर जबरदस्ती करायचा. 

7/10

चाहतने असेही म्हटले की, मी आजारी असताना फरहान शारीरिक संबंधाची मागणी करायचा. आजारी असताना किंवा ताप असतानाही फरहान तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा. तिने म्हटले की, हे तिच्यासाठी खूप वेदनादायक आणि अपमानास्पद होते, ज्यामुळे त्यांचे नाते आणखी बिघडत चाललं होतं. 

8/10

चाहतने असेही सांगितले की, लग्नादरम्यान तिला इस्लाम स्वीकारण्यासाठी ब्रेनवॉश करण्यात आले होते. अभिनेत्रीने तिच्या एक्स नवऱ्याला मनोरुग्ण आहे असा उल्लेख केला आहे. 2018  मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर चाहत दोन मुली जोहर आणि अमायरा यांना एकट्याने सांभाळते. 

9/10

टरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत, चाहत म्हणाली की दोन घटस्फोट आणि आई झाल्यानंतर, तिला इंडस्ट्रीत काम मिळणे कठीण झाले. ती म्हणाली की लोक तिच्या घटस्फोटाकडे चुकीच्या दृष्टीने पाहतात आणि तिचा अन्याय करतात. मला दररोज लोकांना समजावून सांगावे लागते आणि आता मी थकली आहे. असंही ती म्हणाली. 

10/10

तर फरहानने चाहतचे रिभू मेहरासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. अभिनेत्रीनेही हे प्रेमसंबंध मान्य केले होते. कारण नवरा सारखा त्याचा वरुन संशय घ्यायचा म्हणून मी हे नातं स्वीकारलं. पण आम्ही खूप चांगले मित्र असल्याचं अभिनेत्री म्हणाली. 





Read More