Dimple Kapadia: बॉलिवूड ही मायानगरीतील खास आकर्षण आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाची एक अशी गोष्ट आहे. अशीच गोष्ट बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीची आहे. अगदी लहान वयातच अभिनेत्रीला कृष्ठरोग झाला. 80-90 च्या काळात कृष्ठरोग हा अतिशय जीवघेणा आणि संसर्गजन्य आजार समाजला जायचा. अशा काळात या अभिनेत्रीला जीवनात कायापालट करणारी घटना घडली. आणि त्या काळात अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकल. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक असलेल्या डिंपल कपाडियाने आपल्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत.
80-90 च्या दशकात आपल्या अभिनयाच्या जादूने लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारी डिंपल कपाडिया आजही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, फिल्मी दुनियेत येण्यापूर्वी या दिग्गज अभिनेत्री कुष्ठरोगाच्या शिकार झाल्या होत्या.
खुद्द डिंपल कपाडियाने एका कार्यक्रमादरम्यान हे सांगितले. डिंपल कपाडियाने सांगितले की, जेव्हा तिला हा आजार झाला तेव्हा ती फक्त 12 वर्षांची होती.
डिंपल कपाडिया यांनी एका मुलाखतीत आपल्याला कुष्ठरोगाची लागण झाल्याच सांगितलं. त्या काळात सर्वांना वाटायचे की हा आजार एकत्र बसून स्पर्श केल्याने पसरतो. त्यामुळे कुणी माझ्याशी बोलायचं पण नाही.
डिंपल कपाडिया म्हणाल्या होत्या की, त्यावेळी तिला कुष्ठरोग म्हणजे काय हे माहित नव्हते आणि तिच्या हाताच्या कोपरावर त्याची लक्षणे दिसत होती. त्यानंतर तिच्या वडिलांना ओळखणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, यामुळे डिंपलला शाळेतून काढून टाकले जाईल.
डिंपल कपाडिया मुलाखतीत आपल्या आरोग्या तब्बेतीबाबत भावूक होते. पुढे ती सांगते की, याच काळत तिची राज कपूर यांच्याशी भेट झाली.
डिंपल म्हणाली- राज कपूर यांना कोणीतरी सांगितले होते की एक सुंदर मुलगी आहे जी कुष्ठरोगाने पीडित आहे. त्याच काळात राज कपूर 'बॉबी' सिनेमासाठी अभिनेत्रीचा शोध घेत आहे.
यासाठी राज कपूर यांनी वर्तमानपत्रात जाहिरातही काढल्याचे डिंपलने सांगितले. जेव्हा तिने शाळेत ही जाहिरात पाहिली आणि ती या चित्रपटाच्या ऑडिशनला गेली.
डिंपल कपाडियाने सांगितले की, तिला पहिल्यांदा बॉबी सिनेमाकरिता नकार देण्यात आला होता. आणि तिच्या नकाराचे कारण म्हणजे ती ऋषी कपूरपेक्षा वयाने मोठी दिसत होती. डिंपलने पुढे सांगितले होते. नंतर राज कपूरने तिला कॉल केला आणि नंतर सर्व काही चांगले सुरू झाले.