PHOTOS

90च्या दशकातील बॉलिवूड दिवा जिने आपल्या मेहनतीने यश मिळवले आणि आज आहे 250 कोटींची मालकिण

Guess This Bollywood Top Actress: या अभिनेत्रीने तीन दशकांपासून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि आजही आपल्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहेत. फक्त सौंदर्य आणि अभिनय कौशल्यामुळेच नाही तर मेहनत आणि कलेच्या जोरावर कसं जग जिंकता येतं याचं उदाहरण आहे. 47 व्या वर्षीही तीची बॉलिवूडमध्ये क्रेज आहे.

 

Advertisement
1/6
अनेक दशक केले इंडस्ट्री आणि चाहत्यांच्या मनावर राज्य
अनेक दशक केले इंडस्ट्री आणि चाहत्यांच्या मनावर राज्य

अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करणाऱ्या या अभिनेत्रीला तिचे सौंदर्य, स्टाईल आणि अभिनयामुळे प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान मिळाले आहे. तिने अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत, ज्यांचा आनंद तिचे चाहते आजही घेतात. आजही ती बॉलिवूडमधील एक महत्त्वाची अभिनेत्री आहे आणि तिचे फॅन फॉलोइंग अजूनही कायम आहे. आज ती आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे.

 

2/6
कोण आहे ही अभिनेत्री?
कोण आहे ही अभिनेत्री?

ही अभिनेत्री आहे राणी मुखर्जी. राणीचा जन्म 21 मार्च 1978 रोजी पश्चिम बंगालमधील कोलकातामध्ये झाला. तिचे वडील राम मुखर्जी हे चित्रपट दिग्दर्शक होते आणि तिची आई कृष्णा मुखर्जी गायिका होत्या. राणीचे कुटुंब सुरुवातीपासूनच चित्रपटसृष्टीशी जोडलेले होते. राणीने मुंबईतील 'माणिकजी कूपर हायस्कूल'मधून आपले प्राथमिक शिक्षण घेतले आणि नंतर एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठातून गृहशास्त्रात पदवी घेतली. तिने अभिनय शिकण्यासाठी 'रोशन तनेजा अ‍ॅक्टिंग स्कूल'मध्ये शिक्षण घेतले.

3/6
करिअरची सुरुवात
करिअरची सुरुवात

राणीच्या अभिनय कौशल्याला अधिक धार येण्यासाठी, तिने 'रोशन तनेजा अ‍ॅक्टिंग स्कूल'मध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. 1996 मध्ये 'राजा की आएगी बारात' चित्रपटातून तिने तिच्या अभिनय करिअरला सुरुवात केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नसला तरी तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. 1998 मध्ये प्रदर्शित झालेले 'गुलाम' आणि 'कुछ कुछ होता है' या चित्रपटांनी तिच्या करिअरला नवे वळण दिले आणि त्या नंतर राणीला अनेक मोठे प्रोजेक्ट मिळू लागले आणि ती बॉलिवूडमधील एक टॉप अभिनेत्री बनली.

 

4/6
राणीचे हिट चित्रपट
राणीचे हिट चित्रपट

तिच्या 29 वर्षांच्या करिअरमध्ये राणी मुखर्जीने 'कुछ कुछ होता है' (1998), 'साथिया' (2002), 'चलते चलते' (2003), 'हम तुम' (2004), 'वीर-झारा' (2004), 'ब्लॅक' (2005), 'बंटी और बबली' (2005), 'कभी अलविदा ना कहना' (2006), 'नो वन किल्ड जेसिका' (2011) आणि 'मर्दानी' (2014) यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तिचे चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडले आणि त्यासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले. आजही तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये कोणतीही घट झाली नाही.

5/6
मोठ्या चित्रपट निर्मात्याशी झाले लग्न
मोठ्या चित्रपट निर्मात्याशी झाले लग्न

राणी मुखर्जी आपल्या वैयक्तिक आयुष्याला लाइटमधून दूर ठेवणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. 2014 मध्ये तिने बॉलिवूड निर्माते आदित्य चोप्राशी लग्न केले. त्यांना एक गोड मुलगी आदिरा आहे. लग्नानंतरही राणीने अभिनय सुरु ठेवला. 'हिचकी' (2018) आणि 'मर्दानी 2' (2019) यांसारख्या चित्रपटांसह बॉलिवू़मध्ये दमदार कमबॅक केले. ती तिचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवते, तरी तिचे चाहते त्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीचं उत्सुक असतात.

6/6
राणीची एकूण संपत्ती
राणीची एकूण संपत्ती

राणी मुखर्जीने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक मोठे नाव निर्माण केले आहे. तिच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचे झाल्यास, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती आज 228 कोटी ते 250 कोटींची मालकीण आहे. तिचे उत्पन्न चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट्स, स्टेज शो आणि इतर कार्यक्रमांद्वारे येते. राणीने बॉलिवूडमध्ये जवळजवळ 29 वर्षे पूर्ण केली असून, आजही ती तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना प्रभावित करत आहे. ती अजूनही बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.





Read More