जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. हे लक्षात घेऊन हॉस्पिटल, शाळा इत्यादी अनेक सुविधांची संख्या सुद्धा वाढवावी लागतेय जेणेकरून लोकांना सुखसोयी मिळतील आणि त्यांचं जगणं हे सोपं होईल. परंतु तुम्हाला अशा देशाविषयी माहितीये का जिथे एकही हॉस्पिटल नाही? किंवा जिथे 96 वर्षांपासून एकही मुलं जन्माला आलेलं नाही.
लहान मुलं ही देशाचं पुढील भविष्य आहेत असं आपण नेहमीच ऐकतो. भारत आणि चीन हे दोन्ही देश जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहेत. परंतू या जगात एक असा देश आहे जिथे 96 वर्षांपासून एकही मुलं जन्माला आलं नाही. एवढंच नाही तर या ठिकाणी कोणतंही हॉस्पिटल सुद्धा नाही.
आपण अशा देशाविषयी बोलत आहोत जो देश जगाच्या नकाशावरील सर्वात छोटा देश असून येथे रोमन कॅथोलिक ख्रिस्तचन धर्माचे सर्व धर्मगुरू राहतात.
सदर देशाचं नाही वेटिकन सिटी असं आहे. हा जगातील सर्वात छोटा देश असून आश्चर्याची गोष्टी ही की येथे 96 वर्षांपासून एकही मुलं जन्माला आले नाही. हा देश 11 फेब्रुवारी 1929 रोजी बनवण्यात आला असून इथे एकही मुलं जन्माला आलेलं नाही.
देशभरातील सर्व कॅथोलिक चर्च आणि कॅथोलिक ख्रिस्तचन या देशाला आपलं मूळ समजतात. कॅथोलिक चर्च तसेच त्यांचे पादरी आणि जगभरातील प्रमुख धार्मिक नेत्यांना इथूनच नियंत्रित करतात.
महत्वाची माहिती अशी की या देशाच्या निर्मितीपासून येथे एकही हॉस्पिटल बनवण्यात आले नाही. अनेकदा येथे हॉस्पिटल बनवण्याची मागणी करण्यात आली परंतु दरवेळी यासाठी मनाई करण्यात आली. अशात इथे कोणीही गंभीर स्वरूपात आजारी असेल किंवा गर्भवती महिला असेल तर त्यांना रोमच्या हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते. हा देश रोम शहराच्या मधोमध आहे.
असं सांगितलं जातं की वेटिकन सिटीमध्ये हॉस्पिटल नसल्याचं कारण देशाचा छोटा आकार आणि आजूबाजूला चांगले आरोग्याच्या सुविधा पुरवणारे दवाखाने असणे हे असावे. वेटिकन सिटीचं क्षेत्रफळ 118 एकर आह. अशातच सर्व रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांना रोमच्या क्लीनिक आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. या देशात कोणीही मुलाला जन्म देऊ शकत नाही, कारण इथे कोणताही प्रसूती कक्ष नाही. याच कारणामुळे या देशात 96 वर्षांपासून एकही मुलं जन्माला आलं नसेल.
वेटिकन या देशात केवळ 800 ते 900 लोक राहतात. यात रोमन कॅथोलिक ख्रिस्तचन धर्माशी जोडलेले वरिष्ठ पादरी सुद्धा सामील आहेत. मात्र येथे गुन्हेगारीचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. येथे अनेक वैयक्तिक गुन्हे घडतात. हे गुन्हे सहसा विदेशी पर्यटक करतात. सामान्य गुन्ह्यांमध्ये दुकान फोडणे, पाकीट मारणे आणि खिसा कापणे अशा चोऱ्यांचा समावेश असतो.
वेटिकन सिटीमध्ये जगातील सर्वात लहान रेल्वे स्टेशन असून या स्टेशनवर दोन ट्रॅक आहेत. प्रत्येक ट्रॅक हा 300 मीटर लांब असून या स्टेशनचं नाव सिट्टा वेटिकनो असं आहे. हे रेल्वे स्टेशन पोप पायस XI यांच्या काळात तयार करण्यात आलं होतं.