PHOTOS

'या' आगळ्या-वेगळ्या देशात एका वर्षात असतात 13 महिने, दुपारी 12 वाजता सुरु होतो दिवस

एका वर्षात 12 महिने असतात, पण जर तुम्हाला सांगितलं की नाही 13 महिने असतात. तर तुमचा त्यावर विश्वास बसेल का? नाही ना पण एक असा देश आहे ज्या देशात 13 महिने असतात. 

Advertisement
1/8

एक असा देश ज्याचं नाव इथियोपिया आहे. हा दक्षिण आफ्रिकेच्या सींगमध्ये असलेलं एक लॅन्डलॉक्ट कंट्री आहे. ते त्यांच्या पारंपरिक कॅलेंडरचा वापर करतात. इथियोपियामध्ये त्या कॅलेन्डरला गीज किंवा इथियोपाई कॅलेन्डर देखील म्हणतात. 

2/8

इथोपियाच्या गीज कॅलेन्डरच्या सुरुवातीला 12 महिन्यांमध्ये तर ग्रेगोरियन कॅलेन्डर प्रमाणे 30 दिवस असणारे 12 महिने असतात. पण त्याशिवाय 13 वा महिन्यात साधारणपणे 5 दिवस आणि लीप ईयरमध्ये 6 दिवस असतात. हा महिना पागूमे या नावानं ओळखतात. 

3/8

इथियोपिया देश हा त्याच्या पारंपरिक कॅलेन्डरसाठी इतर देशांमध्ये जवळपास 7 वर्ष आणि 3 महिण्यांचा फरक आहे अर्थात तितका तो मागे आहे. खरंतर देश इंटरनॅशनल ट्रेड आणि सरकारी कामासाठी फक्त ग्रेगोरियन कॅलेन्डरचा उपयोग करण्यात येतो. 

4/8

बहुतेक देशांमध्ये (खासकरून ख्रिश्चन देशांमध्ये) ईसा मसीह यांचा जन्म हा 1 ईस्वी पासून मानला जातो. पण इथिओपियामधील ऑर्थोडॉक्स चर्चच्या मते, ईसा मसीह यांचा जन्म 7 वर्ष आधी म्हणजेच 7 ईसा पूर्व झाला होता. म्हणूनच त्यांचा कॅलेंडर बाकी जगापेक्षा वेगळा आहे.

5/8

इतर देशांप्रमाणे इथियोपाइ कॅलेंडरमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी असलेली तारीख देखील वेगळीच आहे. 

6/8

इथे प्रत्येक वर्षी 11 सप्टेंबर रोजी नवीन वर्ष साजरी केलं जातं. लीप ईयरमध्ये हा दिवस बदलून 12 सप्टेंबर करण्यात येतो. 

7/8

इथोपियाची एक वेगळी आणि हटके गोष्ट म्हणजे ही आहे की इथे कॅलेन्डरची गणना देखील वेगळ्या प्रकारे होते. याचा अर्थ जिथे ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये सकाळची सुरुवात ही सकाळी 6 वाजता होते तर इथियोपियामध्ये 12 वाजता सकाळी म्हटलं जातं. 

8/8

तर ज्या वेळी ग्रेगोरियन कॅलेन्डरमध्ये दुपारी 12 वाजतात, तेव्हा त्यावेळी इथियोपियामध्ये संध्याकाळी 6 वाजतात.





Read More