Famous Celebrity Marathi Couple Liplock: अनेकदा ही अभिनेत्री तिच्या पतीबरोबरचे भटकंतीचे फोटो शेअर करताना दिसते. मात्र यावेळेस तिने शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. पाहूयात या दोघांच्या भटकंतीचे खास फोटो
मराठमोळ्या जोडप्याचा परदेशातील हे फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत. पाहूयात काही खास फोटो...
मराठी चित्रपटसृष्टीमधील बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री अशी तिची ओळख आहे.
ही अभिनेत्री तिच्या चित्रपटांमधील भूमिकांबरोबरच खऱ्या आयुष्यातील रोखठोक भूमिकांसाठीही प्रसिद्ध आहे.
खरं तर तिचा नवरा ही मराठीमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. हे दोघेही मराठीमधील कपल गोल्स म्हणावं तसं जोडपं म्हणून ओळखलं जातं.
आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय ते जोडपं म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत!
लग्नाला 13 वर्ष पूर्ण झालेलं हे जोडपं आजही वर्क फ्रंट असेल किंवा भटकंती असे किंवा इतरही अनेक बाबतीत तरुण जोडप्यांना लाजवेल इतकं सक्रीय आहे.
अनेकदा प्रिया तिच्या अकाऊंटवरुन दोघांच्या भटकंतीचे फोटो शेअर करत असते.
अनेक फोटोंमध्ये प्रिया आणि उमेश पदेशात मज्जा, मस्तीच्या मूडमध्ये असल्याचं दिसून येतं.
कधी परदेश दौऱ्यादरम्यानचे समुद्रकिनाऱ्यावरील फोटो तर कधी बाथटबमधील फोटो प्रिया शेअर करताना दिसते.
सध्या प्रिया आणि उमेश रोमममध्ये आहेत. प्रियाने अगदी खास फिल्मी पोज देत उमेशबरोबर रोममधील फोटो शेअर केला आहे.
रोममधील गल्लीबोळांमध्ये आणि प्रसिद्ध स्मारकांना भेटी देत भटकंती करतानाचे फोटोही प्रियाने शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये प्रिया फारच सुंदर दिसत आहे.
मात्र तिने शेअर केलेल्या एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा फोटो सूर्यास्ताच्या वेळीचा आहे.
या फोटोमध्ये प्रिया आणि उमेश लिपलॉक करताना दिसत आहेत. या फोटोला हजारोंच्या संख्येनं लाईक्स मिळालेत.
खरं तर यापूर्वी अनेकदा प्रियाने उमेशच्या गालावर किस करतानाचे वगैरे फोटो शेअर केले आहेत. मात्र पहिल्यांदाच तिने अशाप्रकारे किस करताना फोटो शेअर केलाय.