PHOTOS

41 वर्षांपूर्वी आलेल्या 'या' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली तब्बल 6 पट कमाई; पदार्पणातच अभिनेता बनला सुपरस्टार

या बॉलिवूड चित्रपटातील कलाकारांना रातोरात स्टारडम मिळाले. हा चित्रपट त्या काळात त्याच्या बजेटच्या तब्बल 6 पट अधिक कमाई करणारा ठरला. पाहूयात, कोणता आहे हा चित्रपट. 

Advertisement
1/8

1983 साली प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटातून जॅकी श्रॉफ यांनी बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच पाऊल टाकलं. त्यांचा हा डेब्यू चित्रपट इतका यशस्वी ठरला की त्यांनी एका रात्रीत स्टारडम मिळवलं. 

2/8

80 च्या दशकात थिएटरमध्ये गाजलेला हा चित्रपट त्याच्या निर्मिती खर्चाच्या तब्बल सहापट कमाई करत ब्लॉकबस्टर ठरला आणि निर्मात्यांना मोठा नफा झाला.

 

3/8

16 डिसेंबर 1983 रोजी प्रदर्शित झालेला 'हिरो' हा चित्रपट जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री यांच्या प्रमुख भूमिका असलेला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करुन दोघांच्या करिअरला गती मिळवली.

 

4/8

मीनाक्षी शेषाद्री यांनी या चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका साकारली होती. काहीजण 'हिरो'ला मीनाक्षी यांचा डेब्यू चित्रपट मानतात. मात्र, प्रत्यक्षात त्या 'पेंटर बाबू' (1983) या चित्रपटातून इंडस्ट्रीत आल्या होत्या. मात्र 'पेंटर बाबू' फारसा चालला नाही.

5/8

सुभाष घई दिग्दर्शित 'हिरो' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला इतका भिडला की कुणालाही अपेक्षा नव्हती, एका नवोदित अभिनेत्याला तो सुपरस्टार बनवेल.

6/8

या चित्रपटात जॅकी श्रॉफ यांनी एक गुंडाच्या भूमिकेतून सुरुवात करत, पुढे एक प्रियकर आणि नायक म्हणून उभा राहणारा 'किशन' नावाची भूमिका साकारली. काळ्या जॅकेटमधील त्यांचा हटके लूक, आवाज आणि त्यांची शैली प्रेक्षकांना खूप भावली.

7/8

या चित्रपटासाठी केवळ 3 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, पण त्याने 17 कोटींची कमाई करत निर्मात्यांना जबरदस्त नफा दिला.

 

8/8

या चित्रपटात जॅकी आणि मीनाक्षीसह संजीव कुमार, शम्मी कपूर, अमरीश पुरी, बिंदू, मदन पुरी, शक्ती कपूर, भारत भूषण, सुरेश ओबेरॉय यांसारखे दमदार कलाकारही होते.





Read More