She Is Not Model Or Actress But MLA: फोटोंमध्ये दिसणारी ही तरुणी केवळ 32 वर्षांची आहे. सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असलेल्या या तरुणीची सध्या सगळीकडे चर्चा आहे. कोण आहे की तरुणी आणि ती काय करते जाणून घेऊयात...
फोटोत दिसणारी ही सुंदर तरुणी एका राज्यातील नवनियुक्त आमदार आहे असं तुम्हाला सांगितलं तर कदाचित आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.
ही तरुणी काँग्रेसची आमदार असून तिचं नाव सोफिया फिरदौस असं आहे.
सोफिया ओडिशामधील बाराबती-कटक मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत.
सोफिया या ओडिशामधून निवडून आलेल्या पहिल्या महिला मुस्लिम आमदार ठरल्या आहेत.
भाजपाचे उमेदवार पूर्ण चंद्र महापात्रा यांचा सोफिया यांनी 8 हजार 1 मतांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला.
सोफिया निकालानंतर म्हणजेच 4 जूनपासून आपल्या विजयाबरोबरच सौंदर्यासाठीही सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
सोफिया सोशल मीडियावर फारच सक्रीय आहेत. त्यांचे इन्स्टाग्रामवर 1 लाख 16 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
सोफिया यांचे फोटो पाहून त्या मॉडेल किंवा अभिनेत्री असल्याचा अनेकांचा समज होतो. त्या राजकारणात आहे यावर अनेकांचा लगेच विश्वास बसत नाही.
सोफिया या केवळ 32 वर्षांच्या असून त्या राजकीय कुटुंबातून येतात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहम्मद मोकिम हे सोफिया यांचे वडील आहेत.
सोफिया यांनी कलिंगा इंस्टीट्यूट ऑफ इंडस्ट्रीअल टेक्नोलॉजीमधून सिव्हील इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी 2022 IIMB बंगळुरुमध्येही काम केलं आहे.
2023 मध्ये सोफिया यांना कॉनफ्रेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच 'क्रेडाई'च्या (CREDAI) भुवनेश्वर चॅप्टरचं अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं होतं.