Indian Cricketer Special Instagram Story: या भारतीय क्रिकेटपटूने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून या दोघांना भारतीय क्रिकेटमधील कपल गोल्स असं म्हणत आहेत. या फोटोला दिलेली कॅप्शनही फारच हटके आहे. पाहूयात नेमकं काय आहे या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये...
भारताचा युवा फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवर ऋतुराज गायकवाड सध्या मैदानापासून दूर आहे.
मात्र असं असलं तरी ऋतुराजने नुकताच क्रिकेटच्या मैदानावरील एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला असून तो फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.
ऋतुराजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन महिला क्रिकेट सामन्यातील एक फोटो पोस्ट केला आहे.
ऋतुराजने पोस्ट केलेला फोटो महिलांच्या वरिष्ठ एकदिवसीय चषक स्पर्धेतील आहे. ही भारतीय महिलांची A लिस्टेड स्पर्धा आहे.
आता ऋतुराजने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक महिला क्रिकेटपटू कंबरेवर हात ठेऊन उभी असल्याचं दिसत आहे.
फोटो दिसणारी महिला ही ऋतुराजची पत्नी उत्कर्षा आहे.
ऋतुराजने या फोटोला कॅप्शन देताना, 'Hi There Serious' असं वाक्य लिहिलं असून उत्कर्षाला टॅगही केलं आहे.
उत्कर्षा ही सुद्धा एक उत्तम क्रिकेटपटू असल्याचं फार कमी लोकांना ठाऊक आहे.
ऋतुराजने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा फोटो इंटरनेटवर, 'हे दोघे तर भारतीय क्रिकेटमधील कपल गोल्स सेट करणारं जोपडं आहे,' अशा कॅप्शनसहीत व्हायरल होतोय.