Gulshan Kumar Family Net Worth: बॉलिवूडमध्ये अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने चोप्रा, कपूर, खान आणि बच्चन कुटुंबांसारखी कुटुंब आहेत. ज्याने त्याच्या दमदार अभिनयाच्या तसेच त्याच्या दीर्घकाळ चालणाऱ्या व्यवसायाच्या जोरावर कोट्यवधी रुपयांची संपत्ती निर्माण केली आहे. या कुटुंबांचे चित्रपट उद्योगाशी संबंधित अनेक व्यवसाय आहेत, ज्यामुळे ते करोडपती झाले. पण तरीही अलिकडच्या हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार, बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब दुसरेच कोणीतरी आहे. खान, चोप्रा, कपूर आणि बच्चन यांच्यापेक्षा जास्त संपत्ती कोणाकडे आहे?
बॉलिवूडमध्ये असे अनेक खानदान आहेत जे आज करोडोंमध्ये संपत्ती कमावून बसले आहेत. त्याची एकूण संपत्तीचा आकडा कोणीही आश्चर्यचकित करू शकते. पण आज आम्ही तुम्हाला इंडस्ट्रीतील अशा एका कुटुंबाबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी नेट वर्थच्या बाबतीत इंडस्ट्रीतील टॉप सुपरस्टार्सना मागे टाकले आहे.
पण या टप्प्यावर पोहोचण्यासाठी या कुटुंबाला खूप संघर्ष करावा लागला. खूप कष्ट करून त्यांनी उत्तम उद्योग केला आणि तबल 10 हजार कोटींची मालमत्ता निर्माण केली आहे. हे कुटुंब एका खूप मोठ्या गायकाचे आहे, ज्याने रस्त्यावर काम करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
आजही चित्रपटसृष्टीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्याचे कुटुंब ओळखले जाते. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 च्या अहवालानुसार, एक कुटुंब असे आहे जे बऱ्याच काळापासून चित्रपट उद्योगावर वर्चस्व गाजवत आहे. या कुटूंबाने बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंबाचा दर्जा देखील मिळवला आहे. आपण आज वाढदिवस असलेल्या गुलशन कुमार यांच्या कुटुंबाबद्दल बोलत आहोत, ज्यांनी आपल्या गाण्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत रंग भरला.
1947 मध्ये भारताच्या फाळणीच्या वेळी, हिंदूविरोधी दंग्यांमुळे गुलशन कुमार यांचे कुटुंब पश्चिम पंजाबमधील झांग येथून निर्वासित म्हणून दिल्लीत आले. त्यांचे आजोबा दिल्लीतील दर्यागंजच्या रस्त्यांवर फळांचा रस विकायचे. त्यांचे वडील भगवान शिव आणि माता वैष्णोदेवी यांचे भक्त होते आणि ते अनेक धार्मिक गाणी गायचे. तेव्हा त्यांनी माता वैष्णोदेवीवरील त्यांच्या श्रद्धेमुळे त्यांनी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी मोफत भोजन सेवा सुरू केली. 1997 मध्ये त्यांच्या निधनानंतरही, ही सेवा त्यांचा मुलगा आजही चालवत आहे. तसेच आज तो टी-सिरीज ग्रुप ऑफ कंपनीजचा मालक आहे.
भूषण कुमार यांचे वडील गुलशन कुमार यांनी 70 च्या दशकात शिक्षण पूर्ण केल्यानंतर संगीताच्या जगात प्रवेश केला. त्याने एक संगीत कॅसेट दुकान विकत घेतले आणि तेथून त्याने स्वतःचे रेकॉर्ड लेबल सुपर कॅसेट्स सुरू केले, जे नंतर टी-सीरीज बनले.
आज, टी-सीरीज भारतातील सर्वात मोठ्या चित्रपट स्टुडिओंपैकी एक आहे. त्याच्या अनेक सह-कंपन्या आहेत आणि नोएडामध्ये एक अभिनय शाळा देखील आहे. हुरुन अहवालानुसार, कुमार कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे 10,000 कोटी रुपये (म्हणजे 1.2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त) असल्याचा अंदाज आहे.
याचा अर्थ असा की, कुमार कुटुंबाने कपूर आणि चोप्रा कुटुंबांना मागे टाकत बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. अहवालानुसार, भूषण कुमार यांच्या कुटुंबाची संपत्ती 10,000 कोटी रुपये आहे, तर शाहरुख खानची एकूण संपत्ती 8,096 कोटी रुपये, चोप्रा कुटुंबाची एकूण संपत्ती 7,500 कोटी रुपये, सलमान खानची एकूण संपत्ती 5,259 कोटी रुपये, बच्चन कुटुंबाची एकूण संपत्ती 3,390 कोटी रुपये, कपूर कुटुंबाची एकूण संपत्ती 3,000 कोटी रुपये आणि करण जोहरची एकूण संपत्ती 2000 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.