PHOTOS

Cyber Attack: मोबाईलमध्ये 'हे' चिन्ह दिसलं तर कोणीतरी तुमची स्क्रीन रेकॉर्ड करतंय असं समजा

Smartphone Security: तुम्हाला तुमचा फोन कोणीतरी हॅक करतंय असं वाटतं का? खरोखरच तुम्हाला असं वाटत असेल तर तुमचा फोनच तुम्हाला यासंदर्भातील संकेत देत असतो हे ठाऊक आहे का? हे संकेत नेमके कोणते? ते कसे ओळखावेत? असे संकेत दिसल्यास काय करावं? हेच जाणून घेऊयात...

Advertisement
1/10

तुम्हाला तुमचा फोन हॅक झालाय असं वाटतं का? सध्या एवढ्या मोठ्याप्रमाणात सायबर क्राइमच्या बातम्या येतात ते पाहून हॅकिंग आता सहज शक्य असल्याचं स्पष्टच आहे.

 

2/10

अनेकदा हॅकर्स स्पायवेअर्सच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीच्या मोबाईलमधून बरीच खासगी माहिती सहज चोरतात असं दिसून येतं.

 

3/10

बरेच स्पायवेअर्स थेट हॅक केलेल्या डिव्हाइजची स्क्रीन रेकॉर्ड करतात. स्क्रीनवरील प्रत्येक हालचाल हॅकर्सला कळते आणि त्या माध्यमातून ते बँक अकाऊंटवर डल्ला मारतात.

 

4/10

मात्र कोणी तुमचा मोबाईल हॅक करुन स्क्रीन रेकॉर्ड करत असेल तर तुम्हाला ते तुमच्या मोबाईलवरील काही चिन्हांच्या माध्यमातून समजू शकतं.

 

5/10

वाढणारे सायबर हल्ले आणि युझर्सच्या सुरक्षेसाठी आता मोबाईल कंपन्यांनीच काही नवे फिचर्स आणले असून कोणी स्क्रीन रेकॉर्ड करत असेल तर मोबाईलमध्ये लाईट्सच्या माध्यमातून इशारा दिला जातो. 

6/10

उदाहरण सांगायचं झालं तर स्क्रीन रेकॉर्ड होत असल्यास माईक ऑन केल्यावर हिरव्या रंगाची लाईट पेटते. किंवा कॅमेरा सुरु केला तरी ही हिरवी लाईट पेटते.

 

7/10

तुमच्या मोबाईलची स्क्रीन कोणी रेकॉर्ड करत असेल तर जिथे रेंजचं साईन दाखवलं जातं तिथे म्हणजेच नोटीफेकिशन बारमध्ये कंसात कॅमेराचा सिम्बॉल दाखवला जाईल.

 

8/10

तुम्ही स्वत: स्क्रीन रेकॉर्डींग करत नसाल आणि ही साईन नोटीफिकेशन बारमध्ये दिसली तर नक्कीच कोणीतरी तुमचा फोन हॅक करुन स्क्रीन रेकॉर्ड करतंय असं समजावं. 

 

9/10

हे चिन्ह दिसलं तर तातडीने फोन रिस्टोर करावा. त्यामुळे फोनमधील सर्व अॅप्लिकेशन्सबरोबरच मालवेअर, स्पायवेअर्सही डिलीट होतील.

10/10

यानंतरही हे चिन्ह दिसत असेल तर तुम्हाला तुमचा फोन सर्व्हिस सेंटरमध्ये देऊन ठीक करुन घ्यावा लागेल.

 





Read More