Best Tourism Village Award By World Tourism Organisation: या गावामध्ये मोजकी घरं आहेत. गावची लोकसंख्या 1 हजारहून कमी असून हे गाव जगाच्या नकाशावर झळकावण्यासाठीचे प्रयत्न 30 वर्षांपूर्वी सुरु झाले आणि आता थेट जागतिक स्तरावर या गावाची दखल घेण्यात आली आहे. जाणून घ्या या गावाला भेट देण्यासाठी किती खर्च येईल आणि तिथे कधी भेट द्यावी...
पर्यटनासाठी जगातील सर्वोत्तम गाव ठरलेल्या या गावचं सौंदर्य पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. या गावामध्ये जाण्याचा सर्वोत्तम काळ कोणता, तिथे जाण्याचा खर्च किती येईल यासंदर्भातील माहिती आपण जाऊन घेऊयात...
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील धोरडो या छोट्याश्या गाव हे जगातील पर्यटनासाठीचं सर्वोत्तम गाव ठरलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड टूरिझम ऑर्गनायझेशनने (UNWTO) जगातील 54 गावांपैकी या गावाला पहिला क्रमांक मिळाला आहे.
धोरडोला जागतिक नकाशावर आणण्याचं स्वप्न पंतप्रधान मोदींनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना पाहिलं होतं. या ठिकाणी असलेल्या पांढऱ्या मिठामुळे हिवाळ्यात धोरडो गाव शुभ्रतेमध्ये न्हाऊन निघतं.
पुरस्कार विजेत्या धोरडो गावामध्ये दरवर्षी गुजरात सरकारच्या माध्यमातून रण उत्सव साजरा केला जातो.
अगदी मोजकी घरं असलेल्या धोरडो गावची लोकसंख्या 1 हजारहूनही कमी आहे. या गावाला रण उत्सवापासून खरी ओळख मिळाली.
रण उत्सवाच्या माध्यमातून धोरडो गावामध्ये मूलभूत सुविधा आणि इतर सेवा सुरु करण्यात आल्या. हे गाव पाकिस्तानची सीमा सुरु होण्याआधीच्या टप्प्यात आहे.
धोरडोची पारंपारिक भुंगा पद्धतीची घरं येथील ओळख आहेत. गोलाकार बांधलेली छोट्या छोट्या घरांना भुंगा असं म्हणतात. ही घरं पर्यटकांमध्ये फारच लोकप्रिय आहेत.
धोरडो गावातील गुलबेग मियां यांनी पहिल्यांदा येथे रण उत्सव साजरा केला जावा असं स्वप्न पाहिलं होतं. त्यांनी त्यांच्या मुलाच्या माध्यमातून मोदींपर्यंत ही कल्पना पोहचवली आणि त्यांनाही हे आवडल्याने त्यांनी योजना राबवली.
धोरडो गावामध्ये गुलबेग मियां यांचं स्मारक आहे. गुलबेग यांचे पुत्र हुसैन हे या गावचे सरपंच आहेत.
पंतप्रधान मोदींनी ट्वीटरवरुन यासंदर्भातील माहिती देताना आनंद व्यक्त केला. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनीच या ठिकाणाला पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी स्थानिक कलाकारांनाही मोठा रोजगार वेगवेगळ्या वस्तू विक्रीच्या माध्यमातून मिळाला आहे.
2023 चा रण उत्सव लवकरच सुरु होणार असल्याने त्यापूर्वीच झालेली ही घोषणा झाल्याने येथील पर्यटनाला यंदा अधिक मोठ्या प्रमाणात चालना मिळेल अशी शक्यता आहे.
तुम्ही 2023-24 च्या रण उत्सवाच्या काळात धोरडो गावाला भेट देऊ शकता. रण उत्सव 2023 नोव्हेंबर ते फेब्रुवारी 2024 पर्यंत आयोजित केला जाणार आहे.
अगदी 5500 रुपये ट्वीन शेअरिंग बेसेसवरील रुमपासून ते 9 हजार 600 रुपयांपर्यंत सामान्य दर येथील एका रुमसाठीचे दर आहेत. दिवाळीमध्ये हे दर 6900 ते 11000 दरम्यान आहेत.