PHOTOS

यंदाच्या उन्हाळ्यात नक्की करून पाहा आंब्यापासून बनवलेले 'हे' 7 चविष्ट पदार्थ!

उन्हाळा आला की सगळेच आंब्याची आतुरतेने वाट पाहू लागतात. कारण आंबा म्हणजे फळांचा राजा. त्याच्या गोडसर आणि रसाळ चवीमुळे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच प्रिय असतो. उन्हाळ्यात अनेक लोक आंब्याचे विविध पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न करतात. तर जाणून घेऊयात कोणकोणते चविष्ट पदार्थ आपण आंब्यापासून तयार करू शकतो.

 

Advertisement
1/8
1. मँगो स्मूदी
1. मँगो स्मूदी

दूध, दही आणि ताज्या आंब्याच्या तुकड्यांनी तयार केलेली मँगो स्मूदी हा उन्हाळ्यातील एक हेल्दी आणि थंडगार पर्याय आहे. यात तुम्ही मध, ओट्स किंवा फ्लॅक्स सीड्स घालून ती अजून पौष्टिक बनवू शकता.

2/8
2. मँगो केक
2. मँगो केक

आंब्याच्या पल्पसह तयार केलेला मँगो केक हा गोड आणि स्पंजी असतो. बेकिंग करताना त्यात थोडासा वॅनिला फ्लेवर, कंडेन्स्ड मिल्क आणि मैदा घालून तुम्ही एक चविष्ट केक तयार करू शकता. जो खासकरून घरगुती कार्यक्रमांसाठी अगदी योग्य आहे.

3/8
3. मँगो मस्तानी
3. मँगो मस्तानी

मँगो मस्तानी ही पुण्याची खासियत आहे. आंब्याच्या शेकमध्ये व्हॅनिला किंवा मँगो आइसक्रीम, ड्रायफ्रूट्स, टूटी-फ्रूटी आणि थोडं सजावटीसाठी क्रश्ड आईस घालून तयार केलेली एक पेय आहे. अनेक लोक या पेयाचा आस्वाद घेण्यासाठी खास पुण्यात येतात. 

4/8
4. मँगो करी
4. मँगो करी

थोडा आंबटसर आंबा वापरून बनवलेली ही मँगो करी ही दक्षिण भारतातील खास रेसिपी आहे. नारळाचं दूध, मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याचा फोडणीसाठी वापर करून ती अगदी चविष्ट बनते. ही करी गरम भातासोबत खाल्ली जाते.

5/8
5. मँगो कॅरेट सूप
5. मँगो कॅरेट सूप

 हे थोडंसं हटके कॉम्बिनेशन आहे. आंबा आणि गाजर एकत्र करून तयार केलेलं सौम्य गोडसर आणि पौष्टिक सूप. यामध्ये आलं, लसूण, चवीनुसार मीठ आणि मिरी घालून सूप अधिक फ्लेवरफुल बनवता येतं.

6/8
6. मँगो कूलर
6. मँगो कूलर

उन्हाच्या झळांपासून आराम देणारं हे पेय म्हणजे मँगो कूलर. त्यात आंब्याचा रस, थोडं लिंबू, पुदिन्याची पेस्ट, थोडं मीठ आणि बर्फ टाकून हे पेय तयार होतं. तुम्ही यात साखर न घालता ते डिटॉक्स ड्रिंक म्हणूनसुद्धा घेऊ शकता.

 

7/8
7. आंबा वडी
7. आंबा वडी

आंब्याच्या गरापासून बनवलेली ही गोडसर आणि टिकाऊ वडी पारंपरिक पद्धतीने तयार होते. त्यात साखर, थोडंसं तूप, वेलची आणि काजू-बदाम घालून केलेली ही वडी खूप दिवस टिकते आणि प्रवासासाठीही उत्तम पर्याय ठरते.

8/8

हे सर्व पदार्थ केवळ चवीलाच नव्हे तर शरीरालाही थंडावा देणारे आहेत. या उन्हाळ्यात यापैकी एक तरी रेसिपी नक्की करून पाहा.





Read More