Entertainment : या फोटोमध्ये दिसणारी चिमुकली मोठी होऊन अभिनेत्री झाली. राजेश खन्नापासून सजंय दत्तपर्यंत सगळेच तिचे दिवाने होते. पण तिचं सुत भारतातील श्रीमंत कुटुंबातील मुलाशी जुळलं.
आज बॉलिवूडपासून कोसो दूर असणारी ही चिमुकली एकेकाळी सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. हिच्या सौंदर्याने चाहते घायाळ होते.
एवढंच नाही तर बॉलिवूडमधील अनेक अभिनेते त्याच्या प्रेमात वेडे होते. इंडस्ट्रीमध्ये ब्युटी विथ ब्रेन म्हणून हिची ओळख होती.
आम्ही बोलत आहोत, आशियातील सर्वात श्रीमत मुकेश अंबानी यांचं धाकटे बंधू अनिल यांची पत्नी टीना अंबानी यांच्या बद्दल.
टीना मुनीम (Tina Mumin) यांचा आज 67 वा वाढदिवस आहे. मुंबईतील गुजराती कुटुंबात जन्मलेल्या या चिमुकला लहानपणापासूनच ग्लॅमरची दुनियेत आवरायचं होतं.
मॉडेलिंगने करिअरची सुरुवात केल्यानंतर टीना यांनी वयाच्या 21 व्या वर्षी देस परदेस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
टीना यांची लव्ह लाइफ ही कायम चर्चेत राहिली आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल राजेश खन्ना आणि टीना यांचं प्रेमसंबंध होते, असं मीडिया रिपोर्ट सांगतात.
या दोघांचे प्रेम संबंध हे राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडियाशी लग्न केल्यानंतरही कामय होते. राजेश खन्ना टीनावर इतकं प्रेम करायचे की ते एकच टूथब्रश वापरतात, असं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
त्यांचं नातं इतकं घट्ट होतं की टीना मुनीम राजेश खन्ना यांच्या बंगल्यात राहिली होती. एका मुलाखतीत राजेश खन्ना यांनी सांगितलं होतं की, 'मी डिंपलशी लग्न केलं होतं आणि टीना माझ्या जखमेवर मलम होती.'
टीना यांनी राजेश खन्ना यांना डिंपल यांना घटस्फोट देण्यासाठी सांगितलं होतं. त्यानंतर आपण लग्न करु. पण अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही राजेश खन्नाने डिंपलला घटस्फोट दिला नाही आणि त्यांचं नातं संपुष्टात आलं.
त्यानंतर टीना यांच्या आयुष्यात संजय दत्तची एन्ट्री झाली. एकदा संजय दत्त ऋषी कपूर यांना मारहण्यासाठी त्यांच्या घरी जाणार होता. याबद्दल ऋषी कपूर यांनी आपल्या ‘Kapoor & Sons’ आत्मचरित्रात सांगितलं आहे.
संजय दत्तला कळलं की टीना आणि ऋषी कपूर यांचं अफेयर आहे. ही अफवा निव्वळ अफवा होती. पण संजय ऋषी कपूरला मारहण्यासाठी जाणार होता. पण नितू कपूर हिच्या मध्यस्थीमुळे हा अनर्थ टळला.
झालं असं की, संजय दत्तने आपला मित्र गुलशन ग्रोव्हरला ऋषी कपूर घरी ये असा निरोप देण्यास सांगितलं. पण त्यानंतर संजय दत्तला नितू सिंगने सांगितलं की, ऋषी कपूर आणि माझे प्रेम आहे. यानंतर संजयचा राग शांत झाला आणि संशय मिटला.
पण संजय दत्तसोबतचं नातंही फार काळ टिकलं नाही. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अनिल अंबानी आले.
अनिल अंबानी यांनी टीना यांना एका लग्नात पाहिलं होतं. काळी साडी नेसलेल्या टीना त्यांना पहिल्याच नजरेत आवडल्या होत्या.
अनेक भेटीनंतर त्यांच्यामध्ये प्रेम जुळलं. पण अंबानी कुटुंबाला टीना सून म्हणून पसंत नव्हती. हे नात्याला ब्रेक लागला, पण नियतीमध्ये त्यांचं नातं अनिल यांच्याशी जुळलं होतं. अमेरिकेतील 1989 मधील भूकंपाच्या वेळी टीना तिथे होत्या. अनिल यांना त्यांची काळजी वाटली आणि परत संपर्क केला. त्यानंतर यादोघांनी कोणाचाही विचार न करता 1991 मध्ये लग्न करुन नात्याला विवाहबंधनात बांधले.