PHOTOS

'तारक मेहता'च्या निर्मात्यांशी वाद झाल्यानंतर पलक सिंधवानीने घेतला मोठा निर्णय, फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट

Palak Sindhwani Left TMKOC Comedy TV Show: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' च्या निर्मात्यांशी वादानंतर पलक सिंधवानीने मालिका सोडली आहे. अशातच अभिनेत्रीने सेटवरील फोटो शेअर करत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

Advertisement
1/7
फोटो आणि पोस्ट
फोटो आणि पोस्ट

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये सोनू भिडेची भूमिका साकारणाऱ्या पलक सिंधवानीने मालिका सोडली आहे. अशा परिस्थितीत तिने एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. 

2/7
सेटवरील फोटो
सेटवरील फोटो

पलक सिंधवानीने या मालिकेच्या सेटवरील शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती या मालिकेतील अभिनयासाठी तयार होताना दिसत आहे. 

3/7
ग्रुप फोटो
ग्रुप फोटो

त्यासोबतच तिने अनेक ग्रुप फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती टप्पू सेनेसोबत दिसत आहे. तसेच या फोटोमध्ये अंजली भाभी, तारक मेहता आणि अय्यर यांच्यासह अनेक कलाकार देखील आहेत. 

4/7
ऑफ-स्क्रीन फोटो
ऑफ-स्क्रीन फोटो

पलकने 'तारक मेहता का उल्टा चश्मा' च्या ऑफ-स्क्रीन कलाकारांसोबतचा देखील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोंसोबत तिने एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे. 

5/7
भावनिक पोस्ट
भावनिक पोस्ट

आज मी सेटवरील माझा शेवटचा दिवस संपवत असताना मी गेल्या पाच वर्षांच्या मेहनत आणि चिकाटीने भरलेल्या गोष्टींचा विचार करत आहे. या प्रवासात तुम्ही दिलेले प्रेम आणि पाठिंबा याबद्दल सर्वांचे आभार.

6/7
आभार
आभार

या प्रवासासाठी आणि ज्यांच्यासोबत काम करण्याचा आनंद मला मिळाला त्या सर्व लोकांची मी खूप आभारी आहे. मी प्रत्येक व्यक्तीकडून खूप काही शिकले आहे. ज्यामध्ये हेअर स्टायलिस्टपासून ते स्पॉट टीम, मेकअप टीम आणि इतर सर्व. 

7/7
अद्भूत आठवणी
अद्भूत आठवणी

माझा निरोप अश्रूंनी भरलेला होता. आम्ही एक संघ म्हणून तयार केलेल्या अद्भूत आठवणी मी जपत राहीन. मी हा वेळ चिंतन, विश्रांती आणि मजबूत राहण्यासाठी आणि पुढील गोष्टींसाठी तयार होण्यासाठी घेईन. 





Read More