सॅमसंगचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy Note 9 22 ऑगस्टला भारतात लॉन्च होईल. दुपारी 12 वाजता कंपनीच्या अधिकृत साईट्स आणि युट्युब चॅनेलवर त्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग होईल.
फोन दोन वेरिएन्ट्समध्ये उपलब्ध असेल. बेस वेरिएंटची किंमत 67,900 रुपये आहे. त्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. तर 8GB रॅम आणि 512GB स्टोरेजचा फोन 84,900 रूपयांमध्ये उपलब्ध आहे.
भारतात Galaxy Note 9 ची प्री ऑर्डर सुरू आहे. आज त्याचा शेवटचा दिवस आहे.
सॅमसंग ने सॅमसंग अपग्रेड प्रोग्रामचीदेखील घोषणा केली आहे. त्यानुसार फोन एक्सचेंंगमध्ये 6,000 रूपयांचा बोनस डिस्काऊंट मिळेल. भारतात samsung galaxy note 9 ची विक्री 23 ऑगस्ट पासून होण्याचि शक्यता आहे.
सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 अॅन्ड्रॉईड ओरियो बेस्ड सॅमसंग एक्सपीरियंस यूआई वर चालतो. भारतात फोनमध्ये 2.7 गीगाहर्ट्ज 64-बिट ऑक्टा-कोर एक्सीनॉस 9810 प्रोसेसर आहे.
नोट 9मध्ये 4000 एमएएच बॅटरी सोबत फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी आहे. फोन मध्ये अपर्चर F/1.5 आणि F/2.4 ड्यूल अपर्चर सोबत 12 मेगापिक्सल वाईड अॅन्गल आणि अपर्चर F/2.4 सोबत 12 मेगापिक्सल टेलीफोटो सेंसर आहे. दोन्ही रियर लेंस ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन सोबत आहेत.