क्राईम आणि थ्रिलर वेब सिरीज कोणाला आवडत नाही. फावल्या वेळेत वेब सिरीज पाहणं अनेकांना आवडतं. तुम्हाला जर क्राईम आणि थ्रिलर सिरीज पाहण्याची आवड असेल तर या सिरीज तुम्ही पाहू शकता. कोणत्या वेब सिरीज आहेत पाहूया...
एका छोट्या गावातून चंदन महतो मोठा गुंड कसा बनतो? यावर भाष्य करणारी ही सिरीज अधिकच रोमांचक आहे. पोलीस अधिकाऱ्याची नैतिकता देखील यात दाखवण्यात आली आहे.
सायबर क्राईम अशी वेब सिरीज अनेकांनी पाहिली असेल. गावच्या तरुण पोरांनी कसे पैसे उकळले, यावर आधारित ही सिरीज पाहिल्यावर नक्कीच तुम्हाला नवा संदेश देऊन जाईल.
क्राईम सीरिजमध्ये ऑटोचालक आपलं काम करत असताना लोकांचा कसा शिकार करतो अशी ही थ्रिल आणि क्राईम सिरीज आहे.
खऱ्या आयुष्यातील गँगस्टरची कथा प्रत्येक सीझनमध्ये दाखवण्यात आली आहे. सिरीज पाहताना तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
कथा एका खुन्यावर आधारित आहे जो लोकांना मारून पोलिस स्टेशनच्या बाहेर सोडायचा. पोलिसांच्या कसा शोध घेतला ते पाहा.
क्राईम आणि थ्रिलर अशी मालिका अंगावर काटा आणणारी आहे. 40 खून केलेल्या गुन्हागारेविषयी ही सिरीज आहे. खून केल्यावर पैसे पाठवण्याची पद्धतीमुळे अनेकांना चकीत केलंय.
काही महिला एका पुरुषाला कोर्टात मारतात. नेमकं काय झालं होतं... यावर भाष्य करणारी ही वेब सिरीज Netflix पाहू शकता.
लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या गुन्हेगाराविषयी भाष्य करणारी ही सिरीज चर्चेत आहे.
खतरनाक अशी सस्पेन्स आणि क्राईम, थ्रिल सिरीज. 13 जणांच्या हत्येचा आरोपीचा शोध घेणारी सिरीज, पोलीस पत्रकाराच्या मदतीने आरोपी शोध घेण्याचं प्रयत्न करतं.
विक्रांत मॅसी याच्या दमदार अभिनयाने रंगतदार असलेली ही सिरीज पहायलाच हवी. सत्य घटनेवर आधारित एक नवीन क्राईम स्टोरी दाखवण्यात आली आहे.