PHOTOS

महाराष्ट्रातील 10 सर्वात लांब समुद्रकिनारे; सौंदर्य, शांतता अन्...

Top 10 Longest Sea Beaches in Maharahstra: महाराष्ट्राचा पश्चिम किनारा समुद्राच्या कुशीत विसावलेला आहे. येथे अनेक सुंदर आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे आहेत. काही किनारे धार्मिक महत्त्व असलेले आहेत, तर काही शांततेसाठी आणि साहसासाठी प्रसिद्ध आहेत. हे आहेत महाराष्ट्रातील 10 सर्वात लांब आणि प्रसिद्ध समुद्रकिनारा जिथे तुम्ही निसर्ग, विश्रांती आणि पर्यटनाचा परिपूर्ण अनुभव घेऊ शकता.

Advertisement
1/11
1. केळवा बीच (पालघर)- अंदाजे 8 किमी
1. केळवा बीच (पालघर)- अंदाजे 8 किमी

मुंबईपासून जवळ असलेला केळवा बीच हा शांततेसाठी आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. विस्तीर्ण रेती, नारळाचे झाडं आणि सुर्यास्ताचे रमणीय दृश्य हे या किनाऱ्याचे मुख्य आकर्षण आहे. गर्दीपासून दूर, वीकेंडला रिलॅक्ससाठी उत्तम ठिकाण आहे.

2/11
2. अक्सा बीच (मुंबई - मालाड) - 7 किमी
2. अक्सा बीच (मुंबई - मालाड) - 7 किमी

मुंबई शहरात असूनही हा किनारा तुलनेने शांत आणि स्वच्छ आहे. 'अक्सा बीच' हे नाव अनेक चित्रपटांतून प्रसिद्ध झालं आहे. येथे येणाऱ्यांना शांत वातावरण, समुद्राची थंडीगार हवा आणि रिलॅक्सिंग अनुभव मिळतो.

 

3/11
3. अलिबाग बीच (अलिबाग) - 5 किमी
3. अलिबाग बीच (अलिबाग) -  5 किमी

अलिबाग हे मुंबईकरांचे फेवरिट वीकेंड डेस्टिनेशन आहे. काळ्या रेतीचा समुद्रकिनारा आणि समोर दिसणारा 'कोळबा किल्ला' हे येथील खास आकर्षण आहे. येथे बोटिंग आणि हॉर्स रायडिंगही करता येते.

 

4/11
4. किहीम बीच (अलिबाग) - अंदाजे 4.5 किमी
4. किहीम बीच (अलिबाग) - अंदाजे 4.5 किमी

हा किनारा स्वच्छता, हिरवळ आणि सौंदर्यामुळे ओळखला जातो. नारळ आणि झाडांनी भरलेला किनारपट्टीचा परिसर संपूर्ण पर्यटनाचा अनुभव देतो. फोटोशूट, कॅम्पिंग आणि फॅमिली पिकनिकसाठी हा समुद्र किनारा उत्तम पर्याय आहे.

 

5/11
5. गणपतीपुळे बीच (रत्नागिरी) - 4 किमी
5. गणपतीपुळे बीच (रत्नागिरी) - 4 किमी

कोकणातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ गणपतीपुळे येथील गणपती मंदिर समुद्रकिनाऱ्यावरच वसलेलं आहे. स्वच्छ आणि सुंदर किनारपट्टी, निळंशार समुद्र, आणि धार्मिक महत्त्वामुळे येथे भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात.

 

6/11
6. दिवेआगर बीच (रायगड) - अंदाजे 4 किमी
6. दिवेआगर बीच (रायगड) - अंदाजे 4 किमी

मऊ वाळू, स्वच्छता आणि कमी गर्दी यामुळे दिवेआगर बीच हा एक परिपूर्ण पर्याय आहे. येथे पॅरासेलिंग, बोट रायडिंग यांसारखे प्रकारही करता येतात. खवय्यांसाठी येथील नारळी भात आणि कोकणी पदार्थ प्रसिद्ध आहेत.

 

7/11
7. वेलास बीच (रत्नागिरी) - अंदाजे 3.5 किमी
7. वेलास बीच (रत्नागिरी) - अंदाजे 3.5 किमी

प्रसिद्ध 'कासव महोत्सव' यामुळे वेलास बीच ओळखला जातो. दरवर्षी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी उबवली जातात आणि त्यांची पिल्लं समुद्रात सोडण्याचा सोहळा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतो. शांत आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा किनारा आहे.

8/11
8. हरिहरेश्वर बीच (रायगड) - 3 किमी
8. हरिहरेश्वर बीच (रायगड) -  3 किमी

'दक्षिण काशी' म्हणून ओळखलन जाणारं हरिहरेश्वर हे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. येथे समुद्रकिनाऱ्यालगतच हरिहरेश्वर मंदिर आहे. निसर्ग, अध्यात्म आणि शांतता यांचं अनोखं मिश्रण येथे पाहायला मिळतं.

9/11
9. वारसोली बीच (अलिबाग) - 2.5 किमी
9. वारसोली बीच (अलिबाग) -  2.5 किमी

अलिबागपासून अगदीच जवळ असलेला हा किनारा शांत, स्वच्छ आणि गर्दीपासून दूर आहे. सायकलिंग, लांब पायपीट आणि मेडिटेशन करण्यासाठी ही समुद्र किनारा अगदी योग्य आहे. फोटोग्राफीसाठीही हे ठिकाण उत्तम मानलं जातं.

10/11
10. तारकर्ली बीच (सिंधुदुर्ग - मालवण) - 2.5 किमी
10. तारकर्ली बीच (सिंधुदुर्ग - मालवण) -  2.5 किमी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली बीच हा सर्वात प्रसिद्ध आणि नितळ पाण्याचा किनारा आहे. पांढरी रेती, खोल निळा समुद्र आणि जलक्रीडांसाठी प्रसिद्ध असा हा समुद्र आहे. स्कुबा डायविंग, स्नॉर्केलिंग आणि जेट स्कीइंगसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

 

11/11

महाराष्ट्रातील या समुद्रकिनाऱ्यांमध्ये केवळ सौंदर्य नाही, तर संस्कृती, निसर्ग, साहस आणि शांततेचा देखील समावेश आहे. येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही या पैकी कुठलाही किनारा निवडून अविस्मरणीय अनुभव घेऊ शकता.





Read More