PHOTOS

सनरूफ कारमधून फिरायला आवडतं? 10 लाखांपेक्षाही कमी किंमतीत घरी आणा 'या' बेस्ट कार

f Under 10 Lakhs : ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी भारत एक मोठं मार्केट आहे. भारताची लोकसंख्या पाहून कार कंपन्या प्रत्येक सेगमेंटमध्ये ...

Advertisement
1/7

सध्या देशभरात सनरूफ फिचर असणाऱ्या कारला मोठी मागणी आहे. चालत्या गाडीच्या सनरूफमधून डोकं वर काढून निसर्गाचा आनंद घ्यायला अनेकांना आवडतं. मागणी वाढल्याने जवळपास प्रत्येक ऑटोमोबाईल कंपन्या  सनरूफ फिचर असणाऱ्या कार लाँच करत आहेत. 

 

2/7

मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी कंपन्या 10 लाखांच्या बजेटवाल्या गाड्यांमध्ये सनरूफचा समावेश करतात. तेव्हा आज तुम्हाला काही अशा गाड्यांविषयी सांगणार आहोत ज्यामध्ये सनरूफ फिचर आहे. 

3/7
टाटा पंच :
टाटा पंच :

लिस्टमध्ये टाटा पंच या कारचं नाव सुद्धा सामील आहे. टाटा पंचमध्ये वॉयस असिस्टेड इलेक्ट्रिक सनरूफचा पर्याय मिळतो. या कारची किंमत ही जवळपास 6 लाख रुपये असून ही कार सुरक्षिततेनुसार सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे.

4/7
टाटा नेक्सन :
टाटा नेक्सन :

सनरूफ असणाऱ्या गाड्यांमध्ये टाटा नेक्सनचं नाव सुद्धा सामील असून या प्रकारच्या गाड्यांना मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. या कारची किंमत जवळपास 9 लाख रुपये आहे. या कंपनीच्या कारमध्ये इलेक्ट्रिक सनरूफचं ऑप्शन आहे. 

 

5/7
महिंद्रा XUV 3XO कार :
महिंद्रा XUV 3XO कार :

बजेटमध्ये सनरूफ कार या ऑप्शनमध्ये महिंद्रा XUV 3XO चं नाव सुद्धा सामील आहे. या कारची किंमत ही जवळपास 8 लाख रुपये आहे. या कारमध्ये सनरूफ सोबतच 5-स्टार सेफ्टी रेटिंग सुद्धा दिली जाते. या कारमध्येसुरक्षेच्या दृष्टीने 6 एअरबॅग सुद्धा दिल्या जातात. ज्यामुळे तुमची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढते. 

 

6/7
हुंडईच्या वेन्यू कार :
हुंडईच्या वेन्यू कार :

हुंडईच्या वेन्यू कारमध्ये सुद्धा सनरूफचा फिचर मिळतो. या कारमध्ये सेफ्टीसाठी ड्युअल कॅमेरा सुद्धा दिला जातो. सोबतच या कारमध्ये अनेक फीचर्स सुद्धा असतात, ज्यामुळे या कारची मार्केटमध्ये जास्त डिमांड आहे. हुंडईच्या या कारची किंमत ही जवळपास 8 लाख रुपये आहे. 

7/7
हुंडई एक्सटर :
हुंडई एक्सटर :

सनरूफसाठी हुंडई एक्सटर ही कार सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. या कारमध्ये वॉयस असिस्टेड स्मार्ट इलेक्ट्रिक सनरूफचा ऑप्शन असतो. सोबतच या कारमध्ये सुरक्षेसाठी 6 एअरबॅग सुद्धा मिळतात. या कारची एक्स शोरूम किंमत ही जवळपास 7 लाख रुपये आहे. 





Read More