Top 5 Richest Women Cricketers In India : भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे क्रिकेटर्स हे नेहमी प्रसिद्धच्या झोतात असतात. सध्या क्रिकेटर्स हे मॅच फी सह ब्रँड एंडोर्समेंटमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसे कमावतात. तेव्हा भारताच्या टॉप 5 सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर्सबद्दल जाणून घेऊयात.
भारतातील सर्वात श्रीमंत पुरुष क्रिकेटर्समध्ये सचिन तेंडुलकर, एम एस धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराज सिंह, अशा अनेक नावांचा समावेश आहे. पुरुष क्रिकेटर्सच्या नेटवर्थ ह्या जवळपास कोट्यवधींच्या घरात आहेत. मात्र भारताच्या महिला क्रिकेटर्स सुद्धा श्रीमंतीच्या बाबतीत काही कमी नाहीत.
भारतात काही महिला खेळाडू आहेत ज्या श्रीमंतीच्या बाबतीत काही पुरुष क्रिकेटर्सला सुद्धा टक्कर देतात. तेव्हा भारतातील अशाच काही श्रीमंत महिला क्रिकेटर्सबाबत जाणून घेऊयात.
माजी महिला क्रिकेटर आणि भारताचा कर्णधार मिताली राज हिची एकूण संपत्ती ही जवळपास 40-45 कोटींच्या मध्ये आहे. मितालीने 12 टेस्ट मध्ये जवळपास 699 धावा केल्या. दरम्यान तिने 1 शतक आणि 4 अर्धशतक सुद्धा ठोकली. 232 वनडे सामन्यात मितालीने 7805 धावा केल्या आहेत. तिच्या नावावर या फॉरमॅटमध्ये 7 शतक आणि 64 अर्धशतक आहेत. मितालीने 89 टी20 सामन्यात 2364 धावा केल्या.
मिताली राजनंतर भारताची नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी स्मृती मंधानाचा नंबर येतो. स्मृति मंधाना हिची एकूण संपत्ती 33 कोटींच्या जवळपास आहे. ती भारतातील दुसऱ्या क्रमांकावरची श्रीमंत महिला क्रिकेटर आहे. मंधानाने 7 टेस्टमध्ये 629, 104 वनडेमध्ये 4543 आणि 153 टी20 मध्ये 3982 धावा केल्या.
भारताच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरची एकूण संपत्ती 23 ते 26 कोटींच्या जवळपास आहे. हरमनप्रीतने 6 टेस्टमध्ये 200 धावा, 148 वनडेमध्ये 3967 धावा आणि 182 टी20 सामन्यांमध्ये 3654 धावा केल्या आहेत.
भारताची विस्फोटक फलंदाज शेफाली वर्मा श्रीमंत महिला क्रिकेटर्सच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर असून तिची एकूण संपत्ती ही 11 कोटी रुपये आहे. तिने भारतासाठी 5 टेस्टमध्ये 567 धावा, 29 वनडेमध्ये 644 धावा आणि 90 टी20 सामन्यात 2221 धावा केल्या आहेत.
भारताची महान गोलंदाज झूलन गोस्वामी ही श्रीमंत महिला क्रिकेटर्सच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे. झुलनची नेटवर्थ ही जवळपास 8 कोटी आहे. झूलनने 12 टेस्ट सामन्यांमध्ये 44 विकेट, 204 वनडे सामन्यात 255 विकेट आणि 68 टी20 सामन्यात 56 विकेट घेतल्या.
भारताची स्टार ऑल राउंडर दीप्ती शर्मा ही श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत सहाव्या क्रमांकावर येत असून तिची नेटवर्थ 7 ते 8 कोटी आहे.