ओटीटी या नवमाध्यमामुळे वेब सिरीज ही नवी संक्लपना समोर आली. वेब सिरीजवर सेन्सर बोर्डाचं नियंत्रण नसल्याने बोल्डनेसचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. याआधी सेन्सॉर बोर्डामुळे (censor board) सिनेमामध्ये बोल्ड कंटेंटवर (Bold Movie) लिमिटेशन होतं. मात्र, आता अनेक बोल्ड सिरीजने ओटीटीचा व्याप वाढवला आहे. अशातच नेटफ्लिक्स या प्रसिद्ध ओटीटीवर तुम्ही कोणत्या वेब सिरीज पाहू शकता, याची यादी पाहा...
अभिनेत्री अदिती पोहनकर आणि विजय वर्मा यांनी या सिरीजमध्ये मुख्य भूमिका बजावली आहे. शहराच्या सर्वात शक्तिशाली गुन्हेगाराला पकडण्यासाठी प्रॉस्टट्यूट म्हणून राहणाऱ्या महिलेच्या संघर्षाची कहाणी दाखवण्यात आली आहे. यामध्ये अनेक बोल्ड सीन असल्याने ही सिरीज एकट्यात पाहा.
जमतारा – सबका नंबर आयेगा ही पैश्यांच्या ऑनलाईन घोटाळ्यांवरील आधारित सिरीज आहे. यामध्ये अपमानास्पद भाषेचा आणि शिव्यांचा वापर करण्यात आल्याने ही सिरीज एकट्यात पाहा. यामध्ये सायबर गुन्हेगारीचे विशय किती गंभीर स्वरूपाचे असतात, यावर भाष्य करण्यात आलंय.
प्रेमाची भाषा सरळ सोप्या शब्दात मांडलेली ही सिरीज सर्वांच्या हृदयाच्या जवळ राहिली आहे. कॉमेडी, भरपूर आत्मीयता आणि विश्वास देणारी ही सिरीज सर्वांनी पाहण्याजोगी आहे. ही सिरीज पाहताना तुमच्या इंग्रजी भाषेत कमालीची भर पडू शकते. एकट्याने प्रेम अनुभवण्याची मजाच वेगळी असते, त्यामुळे ही सिरीज एकट्यातच पाहा.
आधुनिक नातेसंबंधांच्या चार कथांचा संग्रह असलेली ही सिरीज बोल्डनेसने भरलेली आहे. सिरीजमध्ये कथांमध्ये वासनेच्या वेगवेगळ्या छटा पहायला मिळतात. त्यामुळे सिरीज एकट्यात पाहा.
एका लहान शहरातील एका तरुणीने तिच्या कॉलेज क्रशविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. प्रकरणाचा तपास आणि घटनेच्या रात्री घडलेल्या घटनांमध्ये गुंतागुंतीचे कथानक यामुळे ही सिरीज अधिक रंजक वाटते. ही सिरीज ही एकट्यातच पाहा.
साक्रेट गेम या सिरीजमुळे खऱ्या अर्थाने ओटीटी प्लॅटफॉर्मला महत्त्व प्राप्त झालं. सस्पेन्स, क्राईम आणि थ्रिल अशी ही सिरीज पाहिली नसेल तर नक्की पाहा, पण गोधडीतच.