राज्यात सध्या अनेक ठिकाणी पाणी टंचाईचे संकट सुरु आहे. अशातच आता भर उन्हाळ्यात कोसळणाऱ्या धबधब्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
पुढील आठ ते दहा दिवस पर्यटकांना या अंब्रेला फॉलचा आनंद लुटता येणार आहे.
ऐन उन्हाळ्यात अंब्रेला फॉल प्रवाहित झाल्याने अनेकजण भंडारदरा परिसरात उन्हाळी पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहेत.
अंब्रेला फॉल धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पाऊले भर उन्हाळ्यातही भंडारदरा परिसराकडे वळत आहेत. राज्याच्या विविध भागातून लोक अंब्रेला फॉलचे मनमोहन दृश्य बघण्यासाठी गर्दी करत आहेत.
भंडारदरा धरणातून शेती आणि पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने प्रसिद्ध असा अंब्रेला फॉल प्रवाहित झाला आहे. राज्यात तापमानाचा पारा वाढलेला असताना अंब्रेला धबधब्यातून कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी पर्यटकांना सुखावून जातेय.
पावसाळा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसर यावर्षी मात्र ऐन उन्हाळ्यातही पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलं आहे आणि त्याला कारण ठरलय अंब्रेला फॉल.
काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. मात्र, अशातच भर उन्हाळ्यात कोसळणाऱ्या धबधब्याची सर्वत्र चर्चा आहे.
राज्यात मार्च महिन्यापासूनच मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचे संकट सुरु झाले आहे. अनेक धरणांमध्ये काही प्रमाणातच पाणीसाठा शिल्ल्क राहिला आहे.