PHOTOS

ट्रॅफिक ई-चालानच्या नावाखाली तुम्हाला असं फसवलं जातंय! मग आता काय करायच? जाणून घ्या

Traffic E challan Fraud: रस्ते वाहतुकीचे नियम न पाळल्यास आपल्या मोबाईलवर ई चालान येते. आपल्याला ऑनलाइन माध्यमातून वाहतूक पोलिसांनी आकारलेला दंड भरावा लागतो. 

Advertisement
1/12
ट्रॅफिक ई-चालानच्या नावाखाली तुम्हाला असं फसवलं जातय! मग आता काय करायच? जाणून घ्या
ट्रॅफिक ई-चालानच्या नावाखाली तुम्हाला असं फसवलं जातय! मग आता काय करायच? जाणून घ्या

Traffic E challan Fraud: रस्ते वाहतुकीचे नियम न पाळल्यास आपल्या मोबाईलवर ई चालान येते. आपल्याला ऑनलाइन माध्यमातून वाहतूक पोलिसांनी आकारलेला दंड भरावा लागतो. 

2/12
बॅंक अकाऊंट रिकामी
 बॅंक अकाऊंट रिकामी

ई चालान आल्यावर आधीच मनस्ताप वाटतो, त्यात ते लवकरात लवकर कसे भरता येईल, यासाठी आपण प्रयत्न करतो. स्कॅमर्सना या गोष्टींची चांगली माहिती असते. याचाच फायदा घेऊन आपले बॅंक अकाऊंट रिकामी करण्याचा प्रयत्न केला जातो.

3/12
सतर्क राहा
सतर्क राहा

सतर्क नाही राहिलात तर ट्रॅफिक ई-चलनच्या नावाखाली तुमचीदेखील फसवणूक होऊ शकते. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) याबाबत निवेदन जाहीर केले आहे. बनावट ई-चलन मेसेज कसे ओळखाचे आणि बॅंक अकाऊंट रिकामी होण्यापासून कसे वाचायचे? याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

4/12
फसवणूक कशी होते?
फसवणूक कशी होते?

सायबर घोटाळेबाज सामान्य लोकांना बनावट ई-चलान पाठवतात. चालान पाठवल्यानंतर त्यांच्याकडून कॉल येतो. तुम्ही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असून लवकरात लवकर चालान भरण्यास ते सांगतात. 

5/12
दुसरी स्टेप्स
दुसरी स्टेप्स

यानंतर त्यांची दुसरी स्टेप्स सुरु होते. ट्रॅफिक ई-चालन भरण्यासाठी स्कॅम लिंक पाठवतात आणि त्यावर क्लिक करण्यास सांगतात. बनावट ई चालान पुढीलप्रमाणे असते. 

6/12
असा असतो मेसेज
असा असतो मेसेज

'तुमच्या वाहनाचा चालान क्रमांक, चलनाची रक्कम पाठवली जाते. ई-चलनच्या ऑनलाइन पेमेंटसाठी https://echallanparivahan.in/ ला भेट द्या. तुम्ही RTO कार्यालयाशी देखील संपर्क साधू शकता. चलन भरा.  साभार- आरटीओ.' असा मेसेज पाठवला जातो.

7/12
सायबर गुन्हेगारांना पैसे
सायबर गुन्हेगारांना पैसे

ई-चालान भरण्यासाठी तुम्ही या पेमेंट लिंकवर क्लिक केल्यानंतर, ट्रॅफिक ई-चालान पोलिसांऐवजी सायबर गुन्हेगारांना दिले जाते.

8/12
फसवणूक कशी टाळायची?
फसवणूक कशी टाळायची?

फसवणूक करणाऱ्यांनी वाहतूक अधिकाऱ्यांनी वापरलेल्या फॉरमॅटची काळजीपूर्वक कॉपी केली आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी पाहणाऱ्यांना ही खरी लिंक असल्याचे वाटते. पण तुम्ही निरीक्षण केल्यास यातील घोटाळा सहज ओळखू शकाल.  ई-चालानचा मेसेज खरा आहे की खोटा? हे पाहण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. 

9/12
हनाचा क्रमांक तपासा
हनाचा क्रमांक तपासा

सर्वप्रथम, आपल्या वाहनाचा क्रमांक तपासा. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जा केलेल्या वाहन क्रमांक प्लेट किंवा स्मार्ट कार्ड (ब्लू बुक) चा संदर्भ देऊन वाहन क्रमांकाची सहज पडताळणी करता येते. 

10/12
अधिकृत वेबसाइट
अधिकृत वेबसाइट

तुम्हाला आलेले ई-चालान क्रमांक वैध आहे की नाही हे तपासण्यासाठी काही स्टेप्स समजून घेऊया. अधिकृत वेबसाइट https://echallan.parivahan.gov.in/index/accused-challan वर लॉग इन करा आणि तुम्हाला खरच चालान आले आहे का ? याची पडताळणी करा. 

11/12
बनावट मेसेजमधील लिंक
बनावट मेसेजमधील लिंक

बनावट मेसेजमधील लिंक  https://echallanparivahan.in अशी असते.

12/12
तंतोतंत सारखी दिसणारी लिंक
तंतोतंत सारखी दिसणारी लिंक

स्कॅमर्स तंतोतंत सारखी दिसणारी लिंक वापरतात. सरकारी वेबसाइट्सचे डोमेन नेहमी https://echallan.parivahan.gov.in/ सारखे '.gov.in' असते हे लक्षात ठेवा. ज्यावर gov. डोमेन आहे, अशा लिंकवर क्लिक करा.





Read More