Traffic Rules In India:अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना पकडल्यास पालक/वाहन मालकास दोषी मानले जाईल आणि 25 हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. यासोबतच ३ वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद आहे.
Traffic Rules In India: सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी वाहतूक नियम आणि त्यांचे पालन आवश्यक आहे. भारतात वाहतुकीबाबत अनेक नियम करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते.
या कारवाईत चलन तसेच तुरुंगवासाची तरतूद आहे. म्हणूनच रस्ते वाहतुकीच्या नियमांची तुम्हाला माहिती असायला हवी आणि तुम्ही त्याचे पालन करायला हवे. अन्यथा तुम्हाला मोठा दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो.
दारूच्या नशेत गाडी चालवू नका. त्यामुळे जीवितासही धोका निर्माण होतो. दारु पिऊन वाहन चालवताना पकडले गेल्यास पहिल्यांदा 10 हजार रुपयांचे चलन आणि/किंवा 6 महिने तुरुंगवास होऊ शकतो.
याशिवाय, पुन्हा व्यसनांच्या प्रभावाखाली वाहन चालवताना पकडले गेल्यास, 15 हजार रुपयांचे चलन आणि/किंवा 2 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवणे ही गंभीर बाब आहे. कारण असे करणाऱ्यांना 5 हजार रुपयांचे चलन बजावले जाते.
विम्याशिवाय वाहन चालवल्यास, 2 हजार रुपयांचे चलन आणि/किंवा 3 महिने तुरुंगवास आणि समुदाय सेवेची तरतूद आहे. पुन्हा असे केल्यास चार हजार रुपयांचे चलन कापले जाऊ शकते.
सिग्नल जंपिंगसाठी, 1 हजार ते 5 हजार रुपयांपर्यंतचे चलन जारी केले जाऊ शकते. याशिवाय परवानाही जप्त केला जाऊ शकतो. यासाठी 6 महिने ते 1 वर्षाचा तुरुंगवासही होऊ शकतो.
हेल्मेटशिवाय दुचाकी किंवा स्कूटर चालवल्यास 1000 रुपयांच्या चलनाची तरतूद आहे.
अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना पकडल्यास पालक/वाहन मालकास दोषी मानले जाईल आणि 25 हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. यासोबतच ३ वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद आहे.