PHOTOS

चप्पल घालून बाईक चालवल्यास ट्रॅफिक पोलीस चलान कापतात? 'हा' नियम तुम्हाला माहिती असायला हवा

अनेकदा चलान का कापले गेले? हेच बाईकस्वारांना कळत नाही. बरेच लोक चप्पल घालून बाईक चालवताना दिसतात. पण चप्पल घालून दुचाकी चालवल्यास तुमच्यावर चलान जारी केले जाऊ शकते का? याबाबत वाहतूक नियम काय आहे? याबद्दल जाणून घेऊया.

Advertisement
1/9
चप्पल घालून बाईक चालवल्यास ट्रॅफिक पोलीस चलान कापतात? 'हा' नियम तुम्हाला माहिती असायला हवा
चप्पल घालून बाईक चालवल्यास ट्रॅफिक पोलीस चलान कापतात? 'हा' नियम तुम्हाला माहिती असायला हवा

Traffic rules: भारतात दुचारीस्वारांची संख्या खूप मोठी आहे.  इथली दुचाकी बाजारपेठ ही जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. भारतात बहुतांश लोक छोट्या प्रवासासाठी दुचाकीचा वापर करतात. पण दुचाकी चालवताना नियम मोडल्यास वाहतूक पोलिसांकडून चलान कापले गेल्याचे तुम्ही पाहिले असले.

2/9
वाहतूक नियम काय आहे?
 वाहतूक नियम काय आहे?

अनेकदा चलान का कापले गेले? हेच बाईकस्वारांना कळत नाही. बरेच लोक चप्पल घालून बाईक चालवताना दिसतात. पण चप्पल घालून दुचाकी चालवल्यास तुमच्यावर चलान जारी केले जाऊ शकते का? याबाबत वाहतूक नियम काय आहे? याबद्दल जाणून घेऊया. 

3/9
नियम काय सांगतो?
नियम काय सांगतो?

मोटार वाहन कायद्यात चप्पल घालून वाहन चालवल्यास चलान कापण्याची काही तरतूद आहे का? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. तुम्हालादेखील या प्रश्नाचे उत्तर माहित असले पाहिजे. जेणेकरून चप्पल घालून वाहन चालवताना तपासणीदरम्यान पोलिसांनी तुम्हाला थांबवले तर तुम्हाला त्याची मदत होईल.

4/9
वाहन कायदा
वाहन कायदा

ऑफिस ऑफ नितिन गडकरी या ट्विटर अकाऊटवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. यानुसार, मोटार वाहन कायद्यात चप्पल घालून दुचाकी चालवल्यास चलान कापण्याची कोणतीही तरतूद नाही. 

5/9
तक्रार करू शकता
 तक्रार करू शकता

यासोबतच तुम्ही लुंगी, बनियान किंवा हाफ शर्ट घालून दुचाकी चालवली तरी वाहतूक पोलिस तुम्हाला चलान कापू शकत नाहीत. तसेच गाडीची काच मळलेली असेल तरी पोलीस चलान कापत नाहीत. असे झाल्यास तुम्ही याबाबत तक्रार करू शकता.

6/9
चप्पल घालून दुचाकी चालवल्यास धोका
चप्पल घालून दुचाकी चालवल्यास धोका

जर तुम्ही चप्पल घालून दुचाकी चालवत असाल तर तुमचे ट्रॅफिक पोलिसांकडून चलान जारी केले जाणार नाही. असे असले तरी ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

7/9
चप्पल न घालणं हे तुमच्या हिताचे
 चप्पल न घालणं हे तुमच्या हिताचे

चप्पल घालून दुचाकी चालवताना अपघात झाला तर गंभीर दुखापत होऊ शकते.चप्पल घालून बाइक चालवताना गीअर्स बदलतावेळी तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यामुळे बाईक चालवताना चप्पल न घालणं हे तुमच्या हिताचे ठरु शकते. 

8/9
या गोष्टींवर कापले जाते चलान
या गोष्टींवर कापले जाते चलान

दुचाकीला फॅन्सी नंबर प्लेट लावणे, दुचाकीवर दोनपेक्षा जास्त प्रवासी असणे, दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणे, दुचाकीवरून ओव्हर स्पीडिंग, रेड सिग्नल क्रॉस करुन पुढे जाणे यासाठई चलान कापले जाऊ शकते.

9/9
आरसी, पीयूसी
आरसी, पीयूसी

यासोबतच वाहनाचे कोणतेही नोंदणी प्रमाणपत्र (RC) नसणे, दुचाकीकडे PUC प्रमाणपत्र नसणे, यापैकी काही असल्यास वाहतूक पोलीस चलान कापू शकतात.





Read More