भारतीय रेल्वे जगातील सर्वात चौथे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात. ग्राहकांसाठी रेल्वेकडून अनेकदा विविध योजना आणल्या जातात.
रेल्वे काही विशेष ग्राहकांसाठी तिकीटावर सूट देते. करोना महामारीनंतर सिनीयर सिटीजनना ट्रेनच्या तिकीटावर मिळणारी सूट बंद करण्यात आली होती. मात्र अजूनही असे काही प्रवासी आहेत त्यांना रेल्वे तिकीट दरात 75 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येते.
रेल्वे ट्रेन प्रवासात काही खास प्रवाशांना डिस्काउंट देते. यात विद्यार्थ्यांपासून ते काही विविध प्रकारच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त दिव्यांगांनाही ट्रेनच्या तिकीटात डिस्काउंट मिळते.
रेल्वे दिव्यांगांना आणि मानसिकरित्या दुर्बळ असणाऱ्या, दृष्टिहीन प्रवाशांना ट्रेन तिकिटांत सूट दिली हाते. तसंच, एखाद्या व्यक्तीच्या मदतीशिवाय प्रवास करु न शकणाऱ्या व्यक्तींना जनरल क्लास,स्लीपर आणि 3 AC मध्ये 75 टक्क्यांची सूट मिळते.
1AC, 2AC मध्ये प्रवाशांना 50 टक्क्यांपर्यंत आणि राजधानी शताब्दीसारख्या ट्रेनमध्ये 3AC आणि AC चेअर कारमध्ये 25 टक्क्यांपर्यंतची सूट मिळते. तसंच, या व्यक्तींच्या सोबत असणाऱ्या मदतनीसाला किंवा प्रवाशांना ट्रेन तिकिटात आणि सामानातदेखील डिस्काउंट मिळते.
असे व्यक्ती ज्यांना बोलण्यास आणि ऐकण्यात असमर्थ आहेत. त्यांना ट्रेनच्या तिकिटात 50 टक्क्यांपर्यंतची सूट मिळते. अशा व्यक्तीसोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही तिकिटावर सूट मिळते.
रेल्वेच्या ट्रेन तिकीटात अनेक विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनादेखील डिस्काउंट मिळते. यात कर्करोग, थॅलेसिमीया, हृदयरोग, किडनी. हीमोफीलियाचे रुग्ण, टीबीचे रुग्ण, एड्सचे रुग्ण, ऑस्टोमीचे रुग्ण, एनीमिया, अप्लास्टिक अॅनिमियाच्या रुग्णांना ट्रेनच्या तिकीटात डिस्काउंट मिळते.
नियमांनुसार, रेल्वे विद्यार्थ्यांनाही दिलासा देते. मुळ गावापासून लांब शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रेनच्या विविध कोचमध्ये 50 ते 75 टक्क्यांपर्यंतची सूट मिळते.