PHOTOS

Ketu Gochar 2023 : मायावी केतूच्या नक्षत्र गोचरमुळे 5 राशींच्या आयुष्यात भूकंप! 26 जूनपासून धनहानी

Ketu Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अशुभ आणि मायावी केतूचं लवकरच नक्षत्र गोचर होणार आहे. त्यामुळे 5 राशींच्या आयुष्यात भूकंप येणार आहे.

Advertisement
1/7

केतू सध्या स्वाती नक्षत्रात असून  26 जून 2023 ला सोमवार संध्याकाळी 06.13 वाजता चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यामुळे 5 राशींना मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होणार आहे. 

 

2/7

या पाच राशींच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनावर वाईट परिणाम दिसून येणार आहे. या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

3/7
मकर (Capricorn)
मकर (Capricorn)

या काळात मकर राशीच्या लोकांचं कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होण्याची भीती आहे. यश मिळवण्यासाठी यांना कठोर मेहनत करावी लागणार आहे. मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. शत्रूपासून सावधान राहा. प्रतिष्ठापणाला लागेल. 

4/7
कन्या (Virgo)
 कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांनी बोलण्यावर विश्वास ठेवा. नातेसंबंधांमध्ये तणाव येणार आहे. तुमच्या बोलण्याने गैरसमज होऊन नाती तुटण्याची भीती आहे. आर्थिक स्थितीही गडबडणार आहे. बचत करणेदेखील तुमच्यासाठी कठीण जाणार आहे. 

5/7
मिथुन (Gemini)
मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांनी प्रेम संबंधात लक्ष द्या. या लोकांच्या प्रेम जीवनात अनेक समस्या येऊन शकतात. विद्यार्थ्यांनीही अभ्यास लक्ष द्या अन्यथा संकटाचा सामना करावा लागेल. मुलांकडे लक्ष द्या. आर्थिक गणित बिघडणार आहे. 

 

6/7
मीन (Pisces)
मीन (Pisces)

या लोकांनी विशेष करुन आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या समस्या उद्भवणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात सावध राहावे लागणार आहे. वेगवेगळ्या समस्यांनी तुम्ही घेरले जाणार असल्याने मानसिक स्थिती खराब असणार आहे. 

 

7/7
कर्क (Cancer)
कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांनी कुटुंबातील वरिष्ठ लोकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. खास करुन आईच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. या काळात तुमचं वैवाहिक जीवनही अस्तव्यस्त होणार आहे. घरातील वातावरण खराब होईल. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.) 





Read More