PHOTOS

अवकाशातील चंद्र भारतात पाहता येतोय; हिमालयाच्या कुशीत दडलंय मोठं रहस्य

Travel News : तुम्हीही या चंद्राच्या बाबतीत माहिती मिळवण्यासाठी उत्सुक आहात का? चंद्राची एक झलक पाहून तुम्हीही भारावता का? 

 

Advertisement
1/7
हा चंद्र तुमच्या स्वागतासाठी सज्ज
हा चंद्र तुमच्या स्वागतासाठी सज्ज

तुमचा विश्वास बसणार नाही, पण भारतातही तुमच्यापासून काही किलोमीटरच्या अंतरावरच चंद्र दडलाय. निसर्गाच्या कुशीत, हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये हा चंद्र तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे. अद्वितीय आणि अविश्वसनीय सौंदर्यानं परिपूर्ण असणारा आणि निस्सिम शांतता असणारा हा चंद्र आहे बर्फानं अच्छादलेल्या पर्वतांच्या कुशीत. हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh). 

 

2/7
चंद्र ताल
चंद्र ताल

आश्चर्याची बाब म्हणजे जसा चंद्रही त्याच्या छटा बदलतो तसा हा पृथ्वीवरील चंद्रही त्याचे रंग बदलताना दिसतो. याचं नाव आहे चंद्र ताल (Moon Lake). नैसर्गिकरित्या अर्धचंद्राकृती आकार असल्यामुळं इथं तलावालाच चंद्र ताल असं नाव देण्यात आलं आहे. 

 

3/7
पवित्र ठिकाण
पवित्र ठिकाण

जसजसा दिवस पुढं जातो तसतसं या तलावातील पाण्याचा रंग निळाशार होताना दिसतो. तलावातील पाणीही काचेसारखं. हा या भागातील एक अतीप्रातीन तलाव असल्याचं सांगण्यात येतं. स्थानिकांसाठी हे एक पवित्र ठिकाण आहे. 

 

4/7
तलावाची गूढता
तलावाची गूढता

चंद्र तालच्या पाण्याचे बदलते रंग त्याची गूढता आणखी वाढवताना दिसतं. समुद्रसपाटीपासून 14,100 फूटांच्या उंचीवर हा तलाव असून, स्पितीच्या खोऱ्यातील कुंझुम पासपासून तो हाकेच्या अंतरावर आहे. आजुबाजूला गवताळ प्रदेश असल्यामुळं इथं तुम्हाला पांढऱ्या शुभ्र वर्णाचे घोडे आणि तत्सम प्राणी मुक्त संचारही करताना दिसतात. हे दृश्य कोणा एका चित्रकारानं साकारलेल्या चित्राहून कमी नाही. 

 

5/7
चंद्रा नदीचं उगमस्थान
चंद्रा नदीचं उगमस्थान

वर्षानुवर्षांच्या मान्यतांनुसार हे ठिकाण चंद्रा नदीचं उगमस्थान आहे. चिनाब या पर्वतीय नदीची ही उपनदी. हिंदू पौराणिक कथांमध्येही चंद्र तालचा उल्लेख आढळून येतो. 

 

6/7
इंद्रदेवाचा रथ
इंद्रदेवाचा रथ

इथं अशी मान्यता आहे की इंद्रदेवाचा रथ इथूनच युधिष्ठीराला त्याच्या स्वर्गातील निवासी घेऊन गेला होता. एक कथा अशीही आहे की, स्पितीच्या खोऱ्यातील हंसा गावातील एक गुराखी हिमनदीतील एका जलपरीच्या प्रेमात पडला होता. 

 

7/7
अद्वितीय ठिकाणाला तुम्ही भेट देणार का?
अद्वितीय ठिकाणाला तुम्ही भेट देणार का?

या पवित्र तलावाच्या पाण्याखाली त्यांचं प्रेम बहरलं. स्थानिकांच्या धारणांनुसार आजही गुराखी इथं आपल्या हरवलेल्या त्याच मित्राचा शोध घेण्यासाठी इथं येतात. अशा या अद्वितीय ठिकाणाला तुम्ही भेट देणार का? (सर्व छायाचित्रे सौजन्य- सायली पाटील)

 





Read More