PHOTOS

जगातील 7 अशी पर्यटनस्थळं जिथं जाण्यासाठी लागतो अमाप पैसा; हे तर श्रीमंतांचं गोवा, केरळ अन् महाबळेश्वर....

Ultra-Rich Destinations: एखाद्या व्यक्तीची श्रीमंती पाहिली, की त्याचा अनेकांनाच हेवा वाटतो. अमुक एका व्यक्तीची जीवनशैली कशी असेल इथपासून या श्रीमंतांच्या आवडीनिवडीसुद्धा कायमच कुतूहलाचा विषय ठरतात... 

 

Advertisement
1/8
Ultra-Rich Destinations
Ultra-Rich Destinations

Ultra-Rich Destinations: जगभरात अशी कैक पर्यटनस्थळं आहेत, जी कायमच पर्यटकांच्या काळजाचा ठाव घेतात. मात्र श्रीमंतांच्या आवडीचीसुद्धा काही खास पर्यटनस्थळं आहेत, जिथं कायमच अमाप पैसा आणि श्रीमंती असणाऱ्याच मंडळींचा राबता असतो. 

 

2/8
बोस्तवाना
बोस्तवाना

आफ्रिकेतील बोस्तवाना इथं खासगी जंगल सफाई आणि हाय एंड इको लॉजची सुविधा श्रीमंतांच्या विशेष आवडीची. इथं मर्यादित पाहुण्यांनाच प्रवेश दिला जातो. जिथं खासगी वाटाड्या या परिसरातील बारकाव्यांची माहिती देतो. 

 

3/8
टर्टल आयलँड, फिजी
टर्टल आयलँड, फिजी

फिजी इथं असणारं टर्टल आयलँड श्रीमंत पर्यटकांसाठी जणू स्वर्ग. इथं खासगी क्षणांपासून ते अगदी आलिशान सुखसोईचा आनंद येणाऱ्यांना मिळतो. बरेच हॉलिवूड सेलिब्रिटी इथं सुट्टीसाठी येतात. 

 

4/8
पार्क सिटी, अमेरिका
पार्क सिटी, अमेरिका

अमेरिकेच्या उताह इथं असणारं पार्क सिटी हगे ठिकाण जगातील महागड्या ठिकाणांपैकी एक आहे. इथं धनाढ्य व्यक्ती अॅडव्हेंचर आणि आरामदायी सुट्ट्यांसाठी येतात. 

 

5/8
मोनेर्का, स्पेन
मोनेर्का, स्पेन

बालेरि आयलँडचं हे रत्न विसरून चालणार नाही. कारण, मोनेर्का हे ठिकाण म्हणजे श्रीमंतांचं गोवा. इथं क्लब, हायकिंगसह आरामदायी सुट्टीचा आनंद घेता येतो. 

 

 

6/8
लेक जास्ना, स्लोवेनिया
लेक जास्ना, स्लोवेनिया

स्लोवेनिया युरोपातील एक असं ठिकाण आहे जे आल्प्स आणि एडियाट्रिक समुद्राच्या मधोमध असून, तिथं एका कमाल खाद्यसंस्कृतीचं दर्शन घडतं. बुटीक वाईनमेकरची वाईन इथं येणाऱ्यांसाठी प्रमुख आकर्षण ठरते. 

 

7/8
काबो सॅन, मेक्सिको
काबो सॅन, मेक्सिको

मेक्सिकोमध्ये असणाऱ्या काबो सॅन या ठिकाणी बोटीनंच पोहोचता येतं. लव्हर्स बीच ही त्याची दुसरी ओळख. पॅसिफिक महासागर आणि सी ऑफ कोर्टेज अशा दोन समुद्राच्या मधोमध हे ठिकाण आहे. 

 

8/8
फ्रेंच पोलिनेशिया
फ्रेंच पोलिनेशिया

बोराबोरा, ताहिती आणि मूरिया अशा बेटांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या फ्रेंच पोलिनेशिया या ठिकाणाची ओळख अनेक श्रीमंत कुटुंबाच्या आवडीचं स्थळ अशीच आहे. इथं अनेक ओवरवॉटर बंगले असून, तिथं कमाल सीफूड आणि ट्रॉपिकल फळं खायला मिळतात. 

 





Read More