Ram Navami 2024 : चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला भगवान विष्णू यांनी राम अवतारात जन्म घेतला. या दिवस रामनवमी म्हणून देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. अयोध्येतील राम मंदिरात जाणं शक्य नसेल तर भारतातील हे 10 प्रसिद्ध राम मंदिरांना तुम्ही भेट देऊ शकता.
भारतातील अयोध्या मंदिर भारतातील एक प्राचीन राम मंदिर असून इथे यंदा रामनवमीचा उत्साहा मोठ्या थाट्यामाट साजरा करण्यात येणार आहे. रामनवमीला सूर्यकिरणे सुमारे पाच मिनिटं रामलल्लाच्या मस्तकावर अभिषेक करण्यात येणार आहे. रामनवमीला दर्शनासाठी अयोध्येत मोठ्या संख्येने भक्त पोहोचत आहेत. रामनवमीच्या दिवशी दुपारी 12.16 वाजेपासून पाच मिनिटे सूर्यकिरण प्रभूच्या कपाळावर पडणार आहे.
मध्य प्रदेशातील हे राम राजा मंदिर झाशीपासून जवळ आहे. झाशीपासून तेरा किलोमीटरवर बेतवा नदीच्या काठावर हे मंदिर वसलंय. इते श्रीरामाची एक राजाच्या रुपात पूजा करण्यात येते. असं करणारे हे भारतातील एकमेव मंदिर आहे.
तेलंगणा राज्यातील हे सीता रामचंद्र मंदिर गोदावरी नदीच्या काठी आहे. हैदराबादपासून तीनशे किलोमीटवर हे प्राचीन मंदिर चारशे वर्ष जुनं आहे.
तमिळनाडूमधील रामास्वामी मंदिर भारतातील प्रमुख राममंदिरापैकी एक आहे. 16 व्या शतकाली हे मंदिर तामिळनाडूमधील कुंभकोणममध्ये आहे. शेकडो वर्ष जुनं असूनही हे मंदिर आजही सुस्थितीत आहे.
काळाराम मंदिर ही महाराष्ट्राची शान आहे. नाशिकमधील हे काळाराम मंदिर 1782 मध्ये सरदार रंगराव ओढेकर यांनी निर्मिती केलीय. हे मंदिर काळा दगडाने निर्माण केल्यामुळे याला काळाराम मंदिर असं म्हणतात. या मंदिरातील रामाची मूर्ती गोदावरीत सापडली अशी मान्यता आहे.
त्रिशूरमध्ये त्रिपायर नदीच्या काठी वसलेलं त्रिपायर श्री राम मंदिर केरळमधील प्रसिद्ध राम मंदिर आहे. ही केरळची देवभूमी मानली जाते. या मंदिरामध्ये भगवान श्रीरामाची पूजा त्रिप्रयारप्पन म्हणजेच त्रिपायर थेवरच्या रूपात करण्याची परंपरा आहे.
ओडीसामधील भुवनेश्वरच्या खारावेलमधील राम मंदिर प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात श्रीरामासह लक्ष्मण आणि सीतेची सुंदर मूर्ती पाहिला मिळते.
कोदंडारामस्वामी मंदिर कर्नाटकमधील चिक्कमगलुरू या थंड ठिकाणी आहे. बंगलोरपासून 250 किलोमीटरवर हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये धर्नुधारी श्रीराम आणि लक्ष्मणाची मूर्ती पाहून मन प्रसन्न होतं. धनुष्याला कोदंडा असं म्हणतात, त्यामुळे या मंदिराला कोदंडारामस्वामी असं नाव पडलं.
नागपूरपासून 54 किलोमीटर अंतरावर रामटेक गावातील उंच टेकडीवर वसलेले हे रामटेक राममंदिर खूप प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. आख्यायिकानुसार असं म्हणतात की, वनवासात असताना श्रीराम इथे थांबले होते म्हणजे टेकले होते, म्हणून याला रामटेक असं नाव पडलं.
जम्मू काश्मिरमधील रघुनाथ मंदिर खूप प्रसिद्ध आहे. 1835 साली महाराजा गुलाब सिंह यांनी या मंदिराची निर्मिती केली. या मंदिरातील आतील भिंतींना सोन्याचा मुलामा पाहून पर्यटकांचे डोळे दिपतात.