Treat For Cricket Fans This Team Will Shock You: सलामीला रोहित शर्मा तर मधल्या फळीत विराटबरोबर बाबर मैदानात आला तर तुम्हाला कसं वाटेल? किंवा एका एण्डने बुमराह गोलंदाजी करतोय तर दुसरीकडून शाहीन शाह आफ्रिदी तर फलंदाजांचं काय होईल? खरोखरच असा सामना लवकरच चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. याचबद्दल...
क्रिकेट विश्वातील नामांकित चेहरे या संघात एकाच नेतृत्वाखाली खेळताना पाहायला तुम्हाला आवडेल का? हा संघ नेमका कसा असेल त्यात कोणकोण खेळू शकतं हे पाहूयात...
सध्या क्रिकेट चाहते अॅफ्रो-आशिया चषकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मागील 17 वर्षानंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळवली जात असल्याने या स्पर्धेबद्दल बरीच उथ्सुकता असून आशियामधील दादा संघ आफ्रिकेतील संघांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. विशेष म्हणजे भारताचे शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली यासारखे खेळाडू बाबर आझम एकाच संघातून खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. आशिया संघाची प्लेइंग इलेव्हन फारच रंजक असणार आहे.
शुभमन गील आणि रोहित शर्मा सलामीवीर म्हणून फलंदाजीला येतील असं ग्राह्य धरलं तर या दोन जागा जवळपास निश्चित आहेत. दोघांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 1 हजार धावांची पार्टनरशीप पूर्ण केली आहे.
या संघात विराट कोहली तिसऱ्या स्थानी राहील यात काही शंका नाही. त्याने या क्रमांकावर 11 हजारांहून अधिक धावा केल्यात आणि 43 शतकं झळकावली आहेत.
मागील काही काळापासून संघर्ष करत असलेल्या बाबर आझमला या संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याची संधी मिळू शकते. तो भारत-पाक कॉम्बिनेशमध्ये अधिक प्रभावी कमागिरी करु शकतो.
पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा विश्वासू फलंदाज मोहम्मद रिझवानला संधी देणं फायद्याचं ठरेल. तो विकेटकीपर बॅट्समन आहे. त्याने वर्ल्ड कप 2023 मध्ये छान कामगिरी केली होती. तो आशिया इलेव्हनमध्ये योग्य ठरेल यात शंका नाही.
आष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्या योग्य निवड ठरेल. त्याने टी-20 वर्ल्डकपमध्ये अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे. तो फलंदाजी आणि गोलंदाजीत चमक दाखवू शकतो.
आणखीन एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे बांगलादेशचा शाकिब-उल-हसन! फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी करणारा शाकिब मॅच विनर ठरु शकतो.
फिरकीची जबाबदारी टी-20 मधील आघाडीचा फिरकीपटू असलेल्या अफागणिस्तानच्या रशीद खानकडे सोपवता येईल.
वेगवान गोलंदाजांमध्ये पाकिस्तानच्या नासीम शाहला संघात स्थान देणं योग्य ठरु शकतं. त्याचा चेंडू उत्तम वळतो. तो फलंदाजांची भांबेरी उडवू शकतो.
पाकिस्तानाचा सर्वोत्तम गोलंदाज असलेला शाहीन शाह आफ्रिदीमुळे या संघाच्या गोलंदाजी अधिक प्रभावी होईल यात शंका नाही. तो उत्तम इन स्विंग टाकतो. सलामीवारांना तंबूत पाठवण्यासाठी त्याचा वेग उपयोगी ठरु शकतो.
आफ्रिदीपेक्षा अधिक प्रभावी ठरणारा गोलंदाज म्हणजे भारताचा जसप्रीत बुमराह! जगातील नंबर एकचा गोलंदाज खेळून काढणं समोरच्यांना नक्कीच कठीण जाईल यात शंका नाही.
आता यापैकी नेमके कितीजण एकाच संघा पाहायला मिळतील हे येणारा काळच सांगेल. तुम्हाला हा असा संघ खेळताना पाहायला आवडेल का? कमेंट करुन नक्की सांगा.