PHOTOS

कोकणासारखंच पण कोकण नाही... अवघ्या 100 रुपयांना मिळतंय घर; कुठं सुरूय ही अनोखी गृहयोजना?

Housing Scheme : घर खरेदीच्या निर्णयाची सुरुवात ही एका चर्चेनं होते आणि ही चर्चासुद्धा काही निकषांवर आधारित असते. अशाच एगा गृहयोजनेची चर्चा संपूर्ण जगात सुरू आहे. 

 

Advertisement
1/8
घर
घर

घर जुनं आहे की नवं, त्याला पुन्हा विकल्यास नेमका किती फायदा होईल याचाही विचार केला जातो. मात्र सध्या एक अशी गृहयोजना चर्चेत आहे जिथं दीर्घकाळासाठी एखाद्या ठिकाणी वास्तव्य करू पाहणाऱ्यांना ही योजना एक उच्चम पर्याय ठरत आहे. 

2/8
फरक
फरक

फरक फक्त इतकाच, की हे ठिकाण काहीसं कोकणासारखं दिसत असलं तरीही ही ठिकाणं आहेत युरोपातील काही टुमदार गावं. जिथं लोकसंख्येत घट झाल्यानं काही कमाल गृहयोजना सुरू करण्यात आल्या आहेत. 

 

3/8
व्यवहार
व्यवहार

शहरात नव्यानं माणसांचा वावर आणि आर्थिक व्यवहार सुरू करणं हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. प्रत्यक्षात इथं विक्रीसाठी उपलब्ध असणारी घरं ही सुस्थितीत नाहीत. 

4/8
खर्चाचा आढावा
खर्चाचा आढावा

काही घरांच्या छतातून पाणी येतंय, काहींमध्ये वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळं घरावर होणाऱ्या या खर्चाचा आढावा घर घेणाय़ऱ्यांनी सरकारला देणंही अपेक्षित आहे. 

 

5/8
अट
अट

घर खरेदी करणाऱ्यांनी ही घरं दुरूस्त करून किमान तीन वर्ष तिथं राहावं, अशी स्थानिक शासनाची अट आहे. येथील घरांकडे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहता येणार नाही. 

6/8
एम्बर्ट
एम्बर्ट

फ्रान्समधील एम्बर्ट (Ambert) शहरामध्ये ही अनोखी योजना सुरू करण्यात आली असून, इथं चक्क 1 युरोमध्ये म्हणजेच भारतीय चलनानुसार 100 रुपयांमध्ये घर मिळत आहे. 

7/8
100 रुपयांना
100 रुपयांना

स्वस्तात, अगदी 100 रुपयांना घर हा प्रस्ताव कितीही आकर्षक वाटत असला तरीही त्यासोबत अनेक अटीशर्थींचं पालनही करणं अपेक्षित आहे. 

8/8
गृहयोजना
गृहयोजना

ही गृहयोजना पहिल्यांदाच खरेदी करणाऱ्यांसाठी असून, कोणाकडे आधीपासूनच घर आहे किंवा कोणी दुसरं घर खरेदी करु इच्छितं तर अशी मंडळी या योजनेत अपात्र आहेत. 





Read More