PHOTOS

आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात 'या' महिला, तरीही त्यांना सर्वात सुंदर मानतात लोक

Himba Tribe Women Interesting Facts: आपल्या रोजच्या दिनचर्यामधील अंघोळ ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु, जगात अशी एक जमाती आहे ज्यांची अंघोळीची वेगळी पद्धत आहेत. या महिला आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात. 

Advertisement
1/8

जगात असे काही लोक आहेत जे दिवसांतून दोन-तीन वेळा अंघोळ करतात. मात्र, जगात अशी एक जमात आहे. ज्यामध्ये त्या जमातीमधील महिला त्यांच्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात. कुठे आहेत या महिला? 

 

2/8

आम्ही ज्या जमातीबद्दल बोलत आहोत ती आफ्रिकेतील उत्तर नामिबियामध्ये राहणाऱ्या हिम्बा जमातीबद्दल आहे. हे लोक अंघोळ न करता स्वतःला कसे स्वच्छ ठेवतात हे आपण जाणून घेऊयात.

3/8

ही जमात अर्ध-भटक्या आहे. म्हणजे हे लोक जंगलात राहतात. त्यामुळे त्यांची जीवनशैली ही जगलात असून ती नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असते. 

4/8

या जमातीच्या महिला त्यांच्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात. ते म्हणजे त्यांच्या लग्नाच्या दिवशी. त्यांच्या जमातीमध्ये गेल्या अनेक शतकांपासून ही परंपरा चालत आली आहे.  

5/8

या महिला अंघोळ न करता त्यांचे शरीर धुराने स्वच्छ आणि निरोगी ठेवतात. तेथील महिला स्वत:ला स्वच्छ ठेवण्यासाठी एक विशेष प्रकारची अंघोळ करतात. 

6/8

ज्यामध्ये या महिला औषधी वनस्पती उकळतात आणि त्याच्या वाफेने त्यांचे शरीर स्वच्छ करतात. ही पद्धत त्यांच्या शरीरातील दुर्गंधी देखील काढून टाकतात. 

7/8

या जमातीचे लोक या परंपरेचे आजही पालन करतात. या जमातीला घनदाट जंगलात राहून देखील सांस्कृतिक वारसा लाभला आहे. त्यांची लोकसंख्या सुमारे 50 हजार आहे. 

8/8

या महिला त्वचेचे सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी एक विशेष लोशन वापरतात. जे प्राण्यांच्या चरबी आणि हेमॅटाइट नावाच्या खनिजापासून बनलेले असते. त्यांचा हा लूक खूप खास दिसतो. त्यामुळे त्यांना आफ्रिकेत सर्वात सुंदर महिला मानल्या जातात. 





Read More