क ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीत 100 वर्षांनंतर त्रिआदित्य योगाचे एक दुर्मिळ संयोग जुळून आला आहे. खरं तर एका आठवड्यात मिथुन राशीत तीन...
त्रिआदित्य योगाचे हे दुर्मिळ संयोजन चंद्र, गुरू, सूर्य आणि बुध यांच्या स्थितीमुळे निर्माण होणार आहे. बुध ग्रह 22 जूनपर्यंत मिथुन राशीत सूर्यासह बुधादित्य राजयोग निर्माण करणार आहे.
22 जूनपर्यंत सूर्य आणि गुरू हे मिथुन राशीत गुरु आदित्य योग तयार करणार आहे. त्यासोबत 24 जूनला चंद्र मिथुन राशीतच संक्रमण करणार आहे. त्यामुळे सूर्य आणि चंद्र शशिआदित्य योग निर्माण होणार आहे.
तब्बल 100 वर्षांनंतर या आठवड्यात तयार झालेले हे आदित्य योग त्रिआदित्य योग पाच राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. कोण आहेत ते भाग्यशाली जाणून घ्या.
या राशीच्या लोकांसाठी त्रिदित्य योग अनेक फायदे घेऊन आला आहे. करिअर आणि व्यवसायात फायदा होणार आहे. तुमचा आत्मविश्वास द्विगुणीत होणार आहे. सुखसोयी आणि सुविधांमध्ये वाढ होणार आहे. तुमच्या सामाजिक संपर्कात वाढ पाहिला मिळणार आहे. या काळात सुरू केलेले काम पूर्ण होण्यास जास्त वेळ लागणार नाही. या काळात मातीचे सोने करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणार आहे.
या राशीच्या लोकांना त्रिदित्य योगामुळे शुभ लाभ होणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या परिश्रमाचे फळ मिळणार आहे. त्यांना सरकारी कामात विशेष यश प्राप्त होणार आहे. सरकारी निविदांसाठीचे प्रयत्न यशस्वी होणार आहे. सरकार आणि प्रशासनाशी संबंधित काम मिळाल्याने आर्थिक स्थितीत सुधारणार आहे. राजकीय आणि सामाजिक कार्यात गुंतलेल्या लोकांचा आदर वाढणार आहे.
त्रिदित्य योग या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात फायदा देणारा ठरणार आहे. तुम्हाला करिअरपासून ते कुटुंबापर्यंत मदत मिळणार आहे. ऑफिसमधील सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य प्राप्त होणार आहे. भागीदारीत केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा मिळणार आहे. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी कानावर पडणार आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी हा चांगला काळ असणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला व्यतित करणार आहात. प्रेमसंबंध अधिक दृढ होणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी त्रिदित्य योग लाभच लाभ घेऊन आला आहे. सर्जनशील आणि बौद्धिक कार्य करून नफा मिळणार आहे. त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा आणि पाठिंबा मिळणार आहे. गुंतवणूक खूप मोठा फायदा होईल. पण सल्ला घेऊनच गुंतवणूक करणे हिताचे ठरणार आहे. या राशीचे लोक आनंदी राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगला असणार आहे. तर त्यांना मानसिक शांती मिळणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी त्रिदित्य योग फायदेशीर ठरणार आहे. मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये लोकांना फायदा होणार आहे. वेळ अनुकूल राहणार आहे. तुम्ही नवीन वाहन खरेदी करणार आहात. जवळच्या मित्रांकडून तुम्हाला पूर्ण मदत मिळणार आहे. कुटुंबात आनंद आणि समृद्धीत वाढ होणार आहे. आईच्या बाजूने मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे. जोडीदाराशी समन्वय वाढल्याने नातेसंबंध अधिक दृढ होणार आहे. (Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)