PHOTOS

Refrigerator Tips: फ्रिजचं कूलिंग कमी होतं? इलेक्ट्रिशियनला बोलावण्याअगोदर 'या' 3 टिप्स वापरुन बघा... पैसे 100% वाचतील

Refrigerator Cooling Tips: आजकाल आपल्या प्रत्येकाच्याच घरात फ्रिज असतो. पण, बऱ्याचदा आपल्या घरातील रेफ्रिजरेटर थंड होत नाही. तसेच जुना झाल्यावर तो हवा तसा थंड होत नाही. तुमच्या फ्रिजमध्येही ही समस्या येत असेल, तर इलेक्ट्रिशियनला बोलवण्यापूर्वी तुम्ही या टिप्स वापरून पाहू शकता.

Advertisement
1/8

आजकाल जवळजवळ प्रत्येकाच्या घरी फ्रिज असतो. पण कधीकधी असे घडते की, फ्रिज व्यवस्थित थंड होत नाही, ज्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेले सामान खराब होते. जर तुमचा फ्रिजही व्यवस्थित थंड होत नसेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा टिप्सबद्दल सांगणार आहोत, ज्या वापरून जुन्यातील जुना फ्रिज नवीनसारखा थंड होईल. 

2/8

जर तुमचा फ्रिज व्यवस्थित थंड होत नसेल, तर तुम्ही प्रथम फ्रिजचे तापमान सेटिंग्ज तपासा आणि ते योग्यरित्या समायोजित करा. फ्रिज नेहमी ४-५ वर चालवावा. असे केल्याने तुमचा फ्रिज व्यवस्थित थंड होऊ शकतो.

3/8

जर तुमच्या फ्रिजचे तापमान योग्य असेल तर तुम्ही आता तुमच्या फ्रिजच्या दरवाज्याचे सिल तपासून घ्या. जर तुमच्या फ्रिजच्या दाराचे सील कोणत्याही कारणास्तव जीर्ण झाले किंवा तुटले असेल किंवा ते घट्ट लागत नसेल तर फ्रिजला व्यवस्थित थंड होऊ देणार नाही.

4/8

जर रेफ्रिजरेटर कमी थंड होत असेल, तर तुम्ही रेफ्रिजरेटरचा कंडेन्सर कॉइल स्वच्छ करू शकता. कृपया लक्षात ठेवा की कंडेन्सर कॉइलवर घाण साचल्यामुळे रेफ्रिजरेटर देखील कमी थंड होतो. ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मऊ ब्रश किंवा व्हॅक्यूम वापरू शकता.

5/8

रेफ्रिजरेटरच्या मागील बाजूस एक छोटा पंखा आहे जो गरम हवा बाहेर काढतो. मागचा पंखा व्यवस्थित काम करत आहे की नाही हे नेहमी तपासा. जर पंखा काम करत नसेल, तर टेक्निशिअनला बोलावून पंखा दुरुस्त करा.

6/8

बऱ्याचदा लोक कमी क्षमतेचा फ्रिज खरेदी करतात कारण तो स्वस्त असतो आणि नंतर त्यात भरपूर सामान भरतात. अशा परिस्थितीत, फ्रिजमध्ये हवेचा प्रवाह योग्य नसतो, ज्यामुळे फ्रिजमध्ये थंडावा कमी असतो. 

7/8

तांत्रिकदृष्ट्या, कोणताही फ्रिज थंड ठेवण्यासाठी हवेचा प्रवाह आवश्यक असतो. तसेच, जर जास्त वस्तू असतील तर मोठ्या आकाराचा फ्रिज खरेदी करणे उचित आहे.

8/8

तसेच फ्रिज ठेवताना त्याची जागा देखील तितकीच महत्त्वाची असते. फ्रिज आणि भिंतीमध्ये किती अंतर असावे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. 





Read More