Turkey earthquake : भूकंपामुळं देशाचं रुपच बदललं आणि सारं जग हळहळलं. ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक मृतदेहांचा खच
तुर्कीमध्ये सध्या बचावकार्याला वेग आला असला तरीही दशकातील सर्वाधिक विध्वंसक भूकंपातून हा देश सावरण्यास बराच वेळ जाईल ही बाब नाकारता येत नाही.
तुर्कीमध्ये होणारी हानी आणि एकंदर चित्र पाहता जागतिक आरोग्य संघटनेकडूनही मृतांचा आकडा वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात आली.
तुर्कीमध्ये घडलेल्या प्रत्येक घडामोडीकडे सध्या संपूर्ण जगाचं लक्ष असून, याचे अनेक फोटो आणि व्हिडीओही व्हायरल होत आहेत.
यामध्ये एका प्रतिष्ठित माध्यम समूहाकडून तुर्कीतील काही ठिकाणांचे Before - After फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
या फोटोंमध्ये भूकंपाचं केंद्र असणाऱ्या गाजियांटेप शहरापासून इतरही अनेक भागांच्या फोटोंचा समावेश आहे.
जिथं काही ऐतिहासिक वास्तूंपासून इमारतीच्या इमारती मातीमोल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
तुर्कीतील भूकंपानंतर समोर आलेल्या अहवालानुसार येथील टेक्टोनिक प्लेट जवळपास तीन मीटरच्या फरकानं सरकली ज्यामुळं हा अतिप्रचंड भूकंप आला.
तज्ज्ञांच्या मते सध्या एनाटोलियन प्लेट आणि अरेबियन प्लेट मध्ये असणाऱ्या 225 किमीपर्यंतच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे. (सर्व छायाचित्र- बीबीसी)