ey Trending News: बायबलमध्ये असे नमूद आहे की जेव्हा हजारो वर्षांपूर्वी, पृथ्वीवर एक विनाशकारी पूर आला होता, तेव्हा एका बोटीने ...
4300 वर्षांपूर्वी बायबलनुसार, या महाकाय बोटीने पृथ्वीवरील मानवतेला विनाशकारी पुरातून वाचवले. बायबलमध्येही अशीच तीन-स्तरीय रचना दिसते. ही आकृती पृष्ठभागापासून सहा मीटर खाली आहे. यामुळे शतकानुशतके जुनी धार्मिक श्रद्धा बळकट झाली आहे.
‘डेली सबाह’च्या (Daily Sabah) एका रिपोर्टनुसार, मे 1948 मध्ये जोरदार पावसामुळे आणि भूकंपानंतर तुर्कीतील काही भागात कीचड वाहून गेल्याने एक रहस्यमय आकृती समोर आली. ही आकृती सर्वात आधी एका मेंढपाळाच्या लक्षात आली. त्यानंतर तज्ज्ञांनी त्यावर शास्त्रीय संशोधन सुरू केले.
बायबलनुसार, एकदा 150 दिवसांच्या प्रलयाने संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली गेली होती. त्यावेळी नोआह यांची बनवलेली एक भलीमोठी नौका (Ark) तुर्कीतील सर्वात उंच पर्वत माउंट एग्री (Mount Ararat) जवळ स्थिरावली होती. बायबलमध्ये या नावेची लांबी 155 मीटर, रुंदी 26 मीटर आणि उंची 16 मीटर इतकी असल्याचं म्हटलं आहे.
अमेरिकन संशोधकांनी तुर्कीतील ड्रुपिनार परिसरात जमिनीखाली रडारच्या सहाय्याने अशीच एक जहाजासारखी आकृती शोधली आहे. ती तब्बल 538 फूट लांब आणि 13 फूट रुंद आहे. वैज्ञानिकांना वाटते की ही आकृती तीच जहाज आहे ज्याची नोंद बायबलमध्ये आहे.
तुर्कीतील ड्रुपिनार हे ठिकाण माउंट अरारात पासून 29 किलोमीटर अंतरावर आहे आणि नोआ आर्कच्या शेवटली बघितली गेलेल्या एका संभाव्य ठिकाणांपैकी एक मानलं जातं. संशोधक अँड्र्यू जोन्स यांच्या नेतृत्वाखाली ही शोधमोहीम पार पडली आहे.
संशोधक जोन्स यांनी असा दावा केला की नोहाच्या जहाजाची ही रचना अगदी त्या बोटीसारखी आहे जी मानवांनी विनाशकारी पुरातून वाचण्यासाठी बांधली असावी. बायबलमध्ये मानवी उत्पत्तीशी संबंधित त्याचा उल्लेख आहे.
जरी या नावेसाठी वापरण्यात आलेली मूळ लाकूड सापडलेलीनाही, तरी रासायनिक अवशेष, केबिनसारखी रचना आणि जहाजाच्या भागांसारखे संरचनात्मक पुरावे सापडले आहेत. या ठिकाणच्या रंगरचनेतूनही हे ठिकाण मानवनिर्मित असावं असं दिसतं.
वैज्ञानिक या जागेवर आणखी ड्रिलिंग आणि सखोल रडार सर्वेक्षण करण्याची तयारी करत आहेत, ज्यामुळे या हजारो वर्ष जुन्या धार्मिक कथेला ठोस वैज्ञानिक आधार मिळू शकेल.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)