PHOTOS

कोकण किनारपट्टीवरुन सोडलेल्या 'बागेश्री'ने श्रीलंकेपर्यंत 'असा' केला प्रवास

Turtles Bageshri and Guha: बागेश्रीचा ट्रॅक पाहिला तर तो अधिक सुसंगतपणे सरळ रेषेत दिसतोय. ‘बागेश्री’ने गोवा, कर्नाटक, केरळ, नागरकॉइल, पुढे श्रीलंकेतील कोलंबो आणि गेल या शहरांपर्यंत प्रवास केला. 'गुहा' कासव थोडे दक्षिणेकडे सरकले पण केरळ किनार्‍यापासून ते त्वरीत उत्तरेकडे वळल्याचे दिसून आले.

Advertisement
1/7
कोकण किनारपट्टीवरुन सोडलेल्या कासवांनी श्रीलंकेपर्यंत 'असा' केला प्रवास
कोकण किनारपट्टीवरुन सोडलेल्या कासवांनी श्रीलंकेपर्यंत 'असा' केला प्रवास

वाइल्ड लाइफ इन्सिट्यूट ऑफ इंडिया, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन आणि महाराष्ट्र वन विभागाच्या  रत्नागिरी, गुहागर विभागाने 23 फेब्रुवारीच्या सकाळी 'बागेश्री' आणि 'गुहा' या दोन्ही कासवांना ट्रान्समीटर बसवून समुद्रात सोडले होते.

2/7
श्रीलंकेतील कालमुनाईजवळ
श्रीलंकेतील कालमुनाईजवळ

श्रीलंकेच्या दक्षिणेकडील किनार्‍यापासून दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर सॅटेलाइट टॅग केलेले कासव बागेश्री आता श्रीलंकेतील कालमुनाई या पूर्व किनारपट्टी शहरापासून 200 किमी दूर आहे. 

3/7
बागेश्री 'अरिबाडा' जवळ
बागेश्री 'अरिबाडा' जवळ

आता बागेश्री जिथे आहे तिथून काही अंतरावरच ओडिशातील 'अरिबाडा' कासवे घरटी करतात. बागेश्रीने प्रवास केलेले सरळ रेषेचे अंतर सुमारे 2,000 किमी आहे 

4/7
बागेश्रीचा सरळ प्रवास
बागेश्रीचा सरळ प्रवास

बागेश्रीचा ट्रॅक पाहिला तर तो अधिक सुसंगतपणे सरळ रेषेत दिसतोय. ‘बागेश्री’ने गोवा, कर्नाटक, केरळ, नागरकॉइल, पुढे श्रीलंकेतील कोलंबो आणि गेल या शहरांपर्यंत प्रवास केला. 

5/7
केरळ किनार्‍यापासून उत्तरेकडे
केरळ किनार्‍यापासून उत्तरेकडे

'गुहा' कासव थोडे दक्षिणेकडे सरकले पण केरळ किनार्‍यापासून ते त्वरीत उत्तरेकडे वळल्याचे दिसून आले. 

6/7
कासवांच्या हालचाली कळणे शक्य
कासवांच्या हालचाली कळणे शक्य

भारतीय वन्यजीव संस्था, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन आणि महाराष्ट्र वन विभागातर्फे हा उपक्रम सुरु आहे. यांच्या प्रयत्नांमुळेच 'बागेश्री' आणि 'गुहा'च्या हालचाली कळू शकत आहेत. 

7/7
पुढचा प्रवास
पुढचा प्रवास

आता या दोन्ही कासवांचा पुढचा प्रवास कसा असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 





Read More