Tushar Deshpande Instagram story : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमियर लीग यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी केली आणि एलिमिनेटर सामना जिंकला. आरसीबीच्या पराभवानंतर चेन्नईचा गोलंदाज तुषार देशपांडे याने आरसीबी कॅन्ट (Bengaluru Cant) अशा केलेल्या स्टोरीबद्दल क्रिडाविश्वात चर्चेला उधाण आलंय.
आरसीबीने साखळी सामन्यात चेन्नईचा पराभव करून प्लेऑफचं तिकीट मिळवलं होतं. त्यामुळे आयपीएलमधील चेन्नईचा प्रवास संपला होता.
तुषार देशपांडेच्या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आरसीबीच्या पराभवानंतर खिल्ली उडवताना दिसतोय.
तुषार देशपांडेने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक रेल्वे स्टेशन दिसत आहे ज्यावर बंगळुरू कँटचा बोर्ड दिसतोय.
आरसीबीच्या पराभवानंतर अनेकदा हा बोर्ड व्हायरल होताना दिसतो. अशातच आता तुषार देशपांडेने हा फोटो शेअर केल्याने चर्चेला उधाण आलंय.
बंगळुरू कॅन्टोन्मेंट रेल्वे स्टेशनचा हा बोर्ड सध्या चर्चेत आहे. त्याला कारण यातून निघणारा गैरअर्थ... बंगळुरूला जमणार नाही, असा त्याचा अर्थ निघतो.
आपली स्टोरी व्हायरल होतीये, असं लक्षात येताच तुषार देशपांडे याने स्टोरी डिलीट केली. मात्र, तोपर्यंत स्टोरीचा स्क्रीनशॉट व्हायरल झालाय.
दरम्यान, आरसीबीचा यंदाचा प्रवास रोमांचक राहिलाय. पहिल्या टप्प्यात सलग 6 सामने हरल्यानंतर आरसीबीने धडाक्यात 6 सामन्यात विजय मिळवला अन् प्लेऑफ गाठली होती.