करोडपती यूट्यूबर रणवीर अलाहबादियासोबत ही टीव्ही अभिनेत्री करणार लग्न. लग्नामध्ये असणार फक्त 30 लोक. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर
यूट्यूबर रणवीर अलाहबादिया सोशल मीडियावर सर्वात चर्चेत असणारा चेहरा आहे. त्याच्या पॉडकास्टवर अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.
दरम्यान, सध्या रणवीर अलाहबादिया त्याच्या पॉडकास्टमुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. ज्यामध्ये तो टीव्ही अभिनेत्री निक्की शर्माला डेट करत असल्याचं समोर आलं आहे.
दोघेही एकत्र सुट्टी घालवण्यासाठी गोव्याला गेले होते. त्यावेळी ते समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेले असता ते बुडता-बुडता वाचले. हा संपूर्ण किस्सा रणवीरने सोशल मीडियावर शेअर केलाय.
मात्र, आता आम्ही तुम्हाला दोघांच्या लग्नाबद्दल सांगणार आहोत. निक्कीने The Motor Mouth यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, मी अनेक रिलेशनशिपमध्ये होते. पण ते कोणत्या ना कोणत्या कारणाने संपले.
ज्यामध्ये माझी आणि माझ्या जोडीदारांच्या काही चुका होत्या. ज्यामुळे आमचे नाते तुटले. त्यानंतर मी अनेक गोष्टी शिकले. आता मी माझा पुढचा प्रवास सुरु केला आहे.
रिलेशनशिपमध्ये नातं टिकवण्यासाठी आदर आणि संवाद खूप महत्त्वाचा असतो. सध्या मी ज्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे त्याच्यासोबत मी स्थिर आहे.
सामाजिक स्तरावर मला थोंड अस्ताव्यस्त वाटत असल्यामुळे आम्ही फक्त 30 लोकांनाच लग्नाला आमंत्रित केलं आहे. ते कोण असणार आहेत त्याबद्दल आम्ही कोणालाही सांगणार नाही.