टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने नुकतेच तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. ज्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
'उत्तरण' मालिकेतून अभिनेत्री रश्मी देसाई ही घराघरात पोहोचली आहे. तिने अनेक शोमध्ये काम केलं आहे. तिने बिग बॉस 13 मध्ये देखील सहभाग घेतला होता.
अभिनेत्री रश्मी देसाईने 'परी हूँ मैं', 'रावण' सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सोशल मीडियावर देखील ती खूप सक्रिय असते. नेहमी चाहत्यांसाठी हटके लूकमधील फोटो शेअर करत असते.
अशातच अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने पहिलं लग्न 2011 मध्ये अभिनेता नंदीश संधूशी केलं होतं.
त्यानंतर 4 वर्षांनी म्हणजेच 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री तिच्या लग्नाबद्दल आईएएनएसशी बोलताना खुलासा केला आहे.
यावेळी तिला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा अभिनेत्री म्हणाली की, माझे आई-वडील माझ्या आयुष्याच्या जोडीदाराबद्दल विचार करत आहेत.
त्यामुळे मला विश्वास आहे की, योग्य व्यक्ती, योग्य वेळी माझ्यासोबत असेल. माझा प्रवास एक कहाणी आहे. कारण माझी स्वप्ने खूप मोठी आहेत.
अभिनेत्रीच्या करिअरबद्दल बोलायचं झाले तर, मालिकांव्यतिरिक्त अभिनेत्रीला आता ओटीटी प्लॅटफॉर्म आणि चित्रपटांमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे.