Mumbai Pune Expressway Mega Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असून वाहतूकदारांच्या सोयीसाठी राज्यातील सर्वाधिक वर्दळीचे यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत. त्याअंतर्गत दोन दिवसासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही महत्त्वाची अपडेट आहे. राज्यातील सर्वात वर्दळीच्या रस्त्यावर आज आणि उद्या 2 दिवसांचा मेगाब्लॉक असणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या मार्गावरील वाहतूक वळवली आहे.
वाहतूकदारांच्या सोयीसाठी राज्यातील सर्वाधिक वर्दळीचे यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत. त्याअंतर्गत गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर नवीन यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. या कारणास्तव या मार्गावर दोन दिवसीय ब्लॉक घेण्यात येत आहेत.
त्यानुसार वाहतूक व्यवस्थापन यंत्रणेने काम करण्यासाठी कि.मी. 93/900 दरम्यान, आज म्हणजेच 3 एप्रिल आणि उद्या म्हणजेच 4 एप्रिल 2024 दरम्यान, दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे.
या वेळेत गॅन्ट्री बसवली जाईल. गॅन्ट्री बसण्यासाठी मुंबई आणि पुणे कॉरिडॉरवरील सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद असणार आहे.
त्यामुळे मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. या मार्गाहून पुण्याहुन, मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने किवळे पुलावरून मुंबई-पुणे मार्गाने मुंबईच्या दिशेने वळवली जातात.
तर मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाक्यावरून (लोणावळा एक्झिट) म्हणजेच मुंबई-पुणे मार्गे पुण्याकडे वळवण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहतूकदारांना रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.