आयपीएल २०२० साठी यूएई सज्ज झाले आहे. मैदानावर करण्यात आलेल्या रोशनाईने मैदानं उजळून निघाली आहे.
इंडियन प्रीमियर लीग २०२० (आयपीएल २०२०) १९ सप्टेंबर पासून यूएईमध्ये रंगणार आहे. अबूधाबी येथे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामना रंगणार आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी बुधवारी आपल्या ट्विटर हँडलवर दुबई आणि अबू धाबीच्या स्टेडियमचे फोटो शेअर केले आहेत. स्टेडिअम रोशनाईने उजळून निघाले आहेत.
युएई आयपीएल २०२० स्पर्धेचे आयोजन करण्यास सज्ज आहे. महत्त्वाचे म्हणजे आयपीएलच्या एकूण ५६ लीग सामन्यांमध्ये दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर २४ तर अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर २० सामने खेळले जाणार आहेत.
दुसरीकडे, १२ लीग सामने शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळले जातील. नुकतीच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शारजाह स्टेडियमवर भेट दिली.