PHOTOS

राज, धनंजय असो वा अजितदादा; काका पुतण्याच्या राजकारणाचं महाराष्ट्राला वावडं!

Uncle Nephew Controversy In Maharastra Politics: अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याविरुद्ध एल्गार केलाय. त्यामुळे आता पुन्हा एकदा काका आणि पुतण्यामध्ये ठिणगी पडल्याचं पहायला मिळतंय. राज्यातील काही उदाहरणं पाहुया...

Advertisement
1/6
शरद पवार-अजित पवार
शरद पवार-अजित पवार

तेल लावलेला पैलवान अशी ओळख असलेल्या शरद पवारांना पुतण्या अजित पवारांनी धोबीपछाड दिलाय. कुणालाच अपेक्षा नव्हती एवढी मोठी फूट राष्ट्रवादीत पडल्याचं दिसून आलंय. त्यामुळे आता काका पुतण्याच्या राजकारणाचा इतिहास उकरून काढला गेलाय.

2/6
बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे
बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे

बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष केलं अन् राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली आणि शिवसेनेविरुद्ध दंड थोपटले.

3/6
गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे
गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे

महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा अशी ओळख असलेल्या गोपीनाथ मुंडे आणि पुतण्या धनंजय मुंडे यांचं देखील पटलं नसल्याचं राजकारणात दिसून आलं. धनंजय मुंडे यांनी देखील काका गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध एल्गार केला आणि भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीशी गाठ बांधली होती.

4/6
अनिल देशमुख-आशिष देशमुख
अनिल देशमुख-आशिष देशमुख

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पुतणे आशिष देशमुख यांच्यात वैर सर्वांना माहित आहे. काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर आशिष देशमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि काकांविरुद्ध शड्डू ठोकले होते.

5/6
जयदत्त क्षीरसागर-संदीप क्षीरसागर
जयदत्त क्षीरसागर-संदीप क्षीरसागर

2016 पासून बीडमध्ये काका-पुतण्यामधील बेबनाव दिसून येत आहे. ठाकरे गटाचे नेते जयदत्त क्षीरसागर यांची हकालपट्टी करण्यात आली होती.  २०१९ ला बीडला चुलता-पुतण्यात लढत झाली होती. त्यावेळी  चुलत्यांना पराभव स्विकारावा लागला होता.

6/6
सुनील तटकरे-अवधूत तटकरे
सुनील तटकरे-अवधूत तटकरे

खासदार सुनील तटकरे यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं प्रस्त आहे. पुतणे अवधूत तटकरे यांच्याकडे सुनील तटकरे यांचा राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जात होतं. मात्र सुनील तटकरे यांचे पुत्र अनिल तटकरे आणि कन्या आदिती तटकरे यांची राजकारणात एन्ट्री झाली अन् अवधूत तटकरे यांचा पत्ता कट झाला.





Read More