PHOTOS

सोने-चांदी सोडा सेफ्टीपिनपासून बनवा 'हे' 8 यूनिक इयरिंग्स अन् व्हा फॅशन क्वीन

Safety Tips Earrings Designs: आजकाल सगळ्या मुली प्रत्येक आउटफिटवर वेगवेगळ्या पद्धतीचे इयरिंग अर्थात कानातले घालतात. त्यात सिंपल आणि मिनिमल लूक हवा असेलं तर त्यासाठी तुमच्यासाठी कानातले फार महत्त्वाचे असते. आता बाजारात अनेक प्रकारचे यूनिक कानातले डिझाइन पाहायला मिळतात. जे घातल्यावर तुम्ही तुमचा लूक आणखी सुंदर दिसतो. सेफ्टी पिनचा वापर करूनही अनेक लोक कानातले बनवतात. आज आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे तुम्ही सेफ्टी पिनचा वापर करून अनेक यूनिक कानातले सोप्या पद्धतीनं घरी बनवू शकतात. 

Advertisement
1/8

जर तुम्हाला सोन्या-चांदीचे कानातले घालून कंटाळ आला असेल तर तुम्ही हूप स्टाइल हे सेफ्टी पिनपासून कानातले बनवू शकतात. ते बनवणं खूप सोपं आहे. 

 

2/8

जर तुम्हालाही सुंदर दिसायचं असेल तर अशा प्रकारचे हार्ट शेप सेफ्टी पिन इयरिंग तुम्ही स्वत: बनवू शकतात. आजकाल बाजारात किंवा ऑनलाइन देखील तुम्ही ते अगदी सहज खरेदी करू शकतात. 

3/8

तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इयरिंग पाहिले असतील पण तुम्ही अशा प्रकारचे पर्ल सेफ्टी पिन इयरिंग कधी पाहिले नसतील. मिनिमल आणि स्टायलिश लूकसाठी तुम्ही हे परिधान करू शकतात. 

4/8

जर तुम्ही तुमच्या आउटफिट्ससोबत काही वेगळे हटके कानातले घालण्याचा विचार करत असाल तर स्टोन वर्क सेफ्टी पिन इयरिंग तुम्ही परिधान करू शकतात. ते पाहिल्यानंतर कोणीही तुमची कॉपी करेल. 

5/8

जर तुम्ही डेटवर जात असाल आणि कानात काही युनिक असं घालण्याचा विचार करत असाल तर तुम्ही बीड्स सेफ्टी पिन कानातले स्वत: घरी बनवून परिधान करू शकतात. त्यानं तुमचा लूक आणखी खुलून दिसेल. 

6/8

जर तुम्हाला बोहेमियन किंवा ट्रेंडी लूक आवडत असेल, तर सेफ्टी पिनसोबत रंगीत फेदर किंवा त्याच रंगाचा एक पंख लावून इयरिंग बनवू शकतात. हे कानातले हलके आणि लक्ष वेधून घेणारे असतात. एखाद्या संगीत कार्यक्रमासाठी किंवा ट्रॅव्हल लूकसाठी योग्य. (Photo Credit : Gork)

7/8

दोन सेफ्टी पिनना एक स्लीम चेनने जोडून युनिक डबल इयरिंग तयार करता येतो. हे मॉडर्न आणि एज्डी लूक देतं. वेस्टर्न आउटफिटसोबत हे इयरिंग्स खूप उठून दिसतात. (Photo Credit : Gork)

8/8

तुम्ही सेफ्टी पिनवर हलका रेझिन किंवा ग्लिटरचा टच देऊन क्रिएटिव्ह इयरिंग्स बनवू शकतात. हे पार्टी किंवा फेस्टिव्ह वेअरसाठी आकर्षक पर्याय ठरतात. (Photo Credit : Gork)





Read More