पाऊस येतो तेव्हा अनेकांना आनंद वाटतो पण तो येताना सोबत अनेक आजार घेऊन येतो. हे आजार कोणते असतात? आणि आजारावेळी तब्येतीची कशी काळजी घ्यायची? सविस्तर जाणून घेऊया.
Unseasonal Rain Health Effect: मुंबईवर सध्या धुळीचे साम्राज्य पसरले आहे. सकाळपासून येथे ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसाला सुरुवात होत आहे. जूनमध्ये येणारा पाऊस 1 महिना आधीच आलाय. अवकाळी पाऊस आल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे.
पाऊस येतो तेव्हा अनेकांना आनंद वाटतो पण तो येताना सोबत अनेक आजार घेऊन येतो. हे आजार कोणते असतात? आणि आजारावेळी तब्येतीची कशी काळजी घ्यायची? सविस्तर जाणून घेऊया.
हा सर्वसामान्य आजार आहे. तुमच्या गळ्यावर याचा परिणाम होतो. ज्यामुळे नाक बंद होतं. घसा खवखवतो, आजाराची लक्षणे दिसतात.
सर्दी ताप आला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. पातळ पदार्थ खा. संतुलित आहार घ्या. खूप फळे आणि भाज्या खा. पाणी उकळून प्या. खाण्यााधी हात धुवायला विसरु नका.
पावसाळ्यात जीवाणुंचे संक्रमण होऊन पोटात मुरडा येतो. पावसाळ्यात प्रदूषित पाणी आणि खाद्य पदार्थांचे सेवन केल्याने डायरियाला आपण आमंत्रण देतो.
प्रदूषित पाण्यामुळे हा आजार जडतो. स्वच्छ पाणी प्या. जेवण ढाकून ठेवा. पाणी उकळून प्या. काहीही खाण्यापूर्वी हात धुवायला विसरु नका.
पावसाळ्यात फूड पॉयझनिंगचा धोका जास्त असतो. पोटात मुरडा, उल्टी होते. शरीरात कमजोरी जाणवते.
या आजारात शरिरात पाण्याची कमी जाणवते. कच्चे आणि स्वच्छ सलाड खा. रस्त्याशेजारी मिळणारे चाट अजिबात खाऊ नका. त्यासाठी दूषित पाणी वापरलं जाण्याची शक्यता असते.
तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. इम्युनिटी बूस्ट करणारे पदार्थ खा. तसेच घरच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. तब्येत ठिक नसेल तर आराम करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या.