PHOTOS

अभिनेत्री नव्हे, या तर IAS! 2 वेळा अपयश; तरी हार नाही मानली; जाणून घ्या अंबिका यांची स्ट्रॅटर्जी

अंबिका सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थिनी होती. त्यांनी अहमदाबाद येथील CEPT विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

Advertisement
1/10
अभिनेत्री नव्हे, या तर IAS! 2 वेळा अपयश; तरी हार नाही मानली; जाणून घ्या अंबिका यांची स्ट्रॅटर्जी
अभिनेत्री नव्हे, या तर IAS! 2 वेळा अपयश; तरी हार नाही मानली; जाणून घ्या अंबिका यांची स्ट्रॅटर्जी

IAS Ambika Raina: केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. ज्यामध्ये दरवर्षी लाखो उमेदवार निवडक पदांसाठी स्पर्धा करतात.

2/10
नागरी सेवक होण्याचे स्वप्न
नागरी सेवक होण्याचे स्वप्न

अंबिका रैना ही या यशस्वी उमेदवारांपैकी एक आहे. जिने स्वित्झर्लंडमधील आपली कारकीर्द सोडून नागरी सेवक होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

3/10
अनेक शहरांमध्ये शिक्षण
अनेक शहरांमध्ये शिक्षण

अंबिका या जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरच्या असून त्यांचे वडील मेजर जनरल आहेत. वडिलांची वेगवेगळ्या शहरात बदली व्हायची म्हणून अंबिका यांनीदेखील अनेक शहरांमध्ये शिक्षण घेतले आहे.

4/10
सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थिनी
सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थिनी

अंबिका सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थिनी होती. त्यांनी अहमदाबाद येथील CEPT विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

5/10
स्वित्झर्लंडची ऑफर नाकारली
स्वित्झर्लंडची ऑफर नाकारली

पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंबिका यांनी स्वित्झर्लंडमध्ये इंटर्नशिप केली. तिथे त्यांना अनेक टॉपच्या कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर आल्या.

6/10
यूपीएससीची तयारी
यूपीएससीची तयारी

परदेशात करिअरचा उत्तम पर्याय असूनही आपली खरी आवड नागरी सेवांमध्ये असल्याचे त्यांना जाणवले. यानंतर त्यांनी भारतात परत येऊन यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

7/10
दोन अपयशांनंतर तिसऱ्या प्रयत्नात यश
दोन अपयशांनंतर तिसऱ्या प्रयत्नात यश

अंबिका यांचा आयएएस बनण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. पहिल्या 2 प्रयत्नांत त्यांना अपयश आले पण त्यांनी हार मानली नाही. त्यानीं स्वत:च्या कमकुवत बाजू ओळखल्या आणि मॉक टेस्टवर लक्ष केंद्रित केले. 

8/10
2022 मध्ये मेहनतीचे चीज
2022 मध्ये मेहनतीचे चीज

2022 मध्ये त्यांच्या मेहनतीचे चीज झाले. यावेळी त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. ऑल इंडिया रँक (AIR) 164 मिळवला. सध्या त्या भारतीय लेखा आणि लेखापरीक्षण सेवा (IAAS) मध्ये अधिकारी आहेत.

9/10
अंबिका रैना तरुणांसाठी प्रेरणास्थान
अंबिका रैना तरुणांसाठी प्रेरणास्थान

अंबिका यांचा प्रवास देशभरातील यूपीएससी इच्छुकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. अंबिका स्वत:चे अनुभव, टिप्स आणि रणनीती शेअर करत असतात.

10/10
कठोर परिश्रम
 कठोर परिश्रम

जर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी समर्पित असाल आणि कठोर परिश्रम केले तर कोणतेही ध्येय साध्य करणे अशक्य नाही, हे त्यांच्या कहाणीतून आपल्याला दिसते.





Read More