बॉलिवूड किंवा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या स्पष्टवक्त्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. पण एक टीव्ही अभिनेत्री आहे जिच्या ब्रा बद्दलच्या वक्तव्यामुळे सर्वच थक्क झाले.
सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी उर्फी जावेद सध्या करण जोहरच्या 'द ट्रेटर्स' या शोमुळे चर्चेत आली आहे.
अशातच उर्फी जावेदची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने असे काही सांगितले की त्यामुळे सर्वच थक्का झाले.
उर्फी जावेदने त्या मुलाखतीत सांगितले होते की, तिने दोन वर्षांपासून ब्रा घातलेली नाही. त्यासोबतच तिने यामागील कारण देखील सांगितले आहे.
उर्फी म्हणाली की, तिला स्पोर्ट ब्रा म्हणजे काय असते हे देखील तिला माहिती नव्हते. तिने सांगितले की तिच्या आईला ब्रा खरेदी करताना खूप लाज वाटत होती.
पुढे ती म्हणाली की, ती ब्रा अजिबात घालत नाही. तिने दोन वर्षांपूर्वी ती घालणे बंद केले आहे. कारण तिला खूप अस्वस्थ आहे.
त्यासोबतच तिने या शोमध्ये सांगितले होते की तिने गेल्या तीन वर्षांपासून एकाही मुलाला किस केले नाही.
इतकच नाही तर कोणत्याही मुलाशी प्रेमाबद्दलही ती कधीच बोलली नाही. उर्फीने अशी विधाने करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
उर्फी जावेद अनेकदा तिच्या स्पष्टवक्त्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. त्यामुळे तिला ट्रोल देखील केलं जातं.